… म्हणून कोणी राजीनामा देतं का, मुनगंटीवारांचा अजित पवारांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचे नाव विनाकारण घेतल्याने आणि पवार कुटुंबावर राजकीय सुडभावनेने कारवाई केल्याने मन दुखावल्याने आपण आमदारकीचा राजीनामा दिला असे अजित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यानंतर सत्ताधारी भाजपमधून विविध प्रतिक्रिया देखील आल्या. त्यानंतर मन विषण्ण झाल्याने कोणी राजीनामा देत का? असा सवाल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांना केला.

अजित पवारांना उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, जनतेची काम करण्यासाठी तुम्ही आमदार झाला आहात. त्यामुळे मन विषण्ण झाल्याने राजीनामा देणे योग्य नाही. शिखर बँकप्रकरणी कारवाईत राज्य सरकारचा काहीही संबंध नाही, ही कोणत्याही प्रकारची सुडाची कारवाई नाही. यात फक्त मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे.

अजित पवारांच्या प्रश्नाला मुगंटीवाराचे उत्तर –
अजित पवारांनी शिखर बँकेप्रकरणी सवाल उपस्थित केला की बँकेत फक्त 11 हजार कोटींच्या ठेवी असताना घोटाळा 25 हजार कोटींचा कसा काय? हा प्रकार आम्हाला बदनाम करण्याचा आहे. यावर प्रतिउत्तर देताना मुंगटीवार म्हणाले की, याप्रकरणी तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे ही आकडेवारी मांडण्यात आली. त्यावर उच्च न्यायलयाने हे खरे आहे की नाही हे तपासण्यासाठी एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. सरकारने फक्त न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले. त्यामुळे ही सरकारने सूडबुद्धीने केलेली कारवाई नाही आणि जर 25 हजार कोटींचा आकडा चुकीचा असेल तर न्यायालयासमोर आणि चौकशी संस्थांसमोर त्यांनी त्याचा खुलासा करावा.

मुगंटीवार म्हणाले की, त्यांना जर असे वाटत की पवारांचे नाव असल्याने केस उभी राहिली तर आता उच्चन्यायालयाला विचारावे लागेल की या प्रकरणात पवारांचे नाव असल्या कारणानेच त्यांनी एफआयआरचे आदेश दिले होते का?

विरोधकांवर खटले चालवून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यामुळे आम्हाला असं करण्याची गरजच नाही. आम्ही निवडणुका आमच्या कर्तुत्वावर आणि कामावर जिंकतो असे म्हणत मुनगंटीवार यांनी अजित पवार यांनी भाजपवर लावलेले आरोप फेटाळून लावेल.