राज ठाकरेंना त्यांचेच ‘उमेदवार’ माहिती नाहीत ?, सभेनंतर चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेची सुरुवात पुण्यातून होणार होती. पण, पावसामुळे ९ ऑक्टोबरची सभा रद्द करण्यात आली. ही रद्द करण्यात आलेली सभा सोमवारी मंडई परिसरात झाली. यावेळी त्यांच्या भाषणावरुन राज ठाकरे यांना आपले उमेदवार कोणत्या मतदारसंघातून उभे आहेत. कोण कोणाला लढत देत आहेत, याची माहिती नाही का अशी चर्चा सभा संपल्यानंतर सुरु झाली.

ही चर्चा राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या उमेदवारांची घेतलेल्या नावावरुन सुरु झाली. सभा सुरु झाल्यानंतर काही वेळाने कोल्हापूरातून एक मंत्री कोथरुडपर्यंत वाहत आला, अशा शब्दात राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. तेव्हा उपस्थितांमधून ‘‘चंपा चंपा’’ असा गजर सुरु झाला. उपस्थितींच्या मागणीला प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी आपला हजरजबाबीपणा दाखवत बाकी पुणेकर नावे ठेवण्यात पटाईत असे म्हणून या चंपाची चंपी करण्यासाठी आमचा अजय आहे. कोठे आहे, अजय शिंदे अशी विचारणी केली.

पण, कोथरुडमधून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे हे लढत देत आहेत. मात्र, त्यांनी अजय शिंदे यांचे नाव घेतले. तसेच कॅटोंमेंटमधून मनसेकडून मनीषा सरोदे या उभ्या आहेत. पण, ठाकरे यांना त्यांचे नावच लक्षात नसल्याचे त्यांच्या भाषणावरुन दिसून आले. त्यामुळे सभा संपल्यानंतर ठाकरे यांना त्यांचेच उमेदवार कोठून उभे आहेत, याची माहिती नाही की त्यांनी सभेला येताना गृहपाठ केला नाही, अशी चर्चा होऊ लागली होती.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like