‘द कपिल शर्मा शो’मध्ये सिद्धूंच्या वापसीसाठी सल्लूमियांची धडपड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यानंतर खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांना त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच फटका बसला आहे. सोशल मीडियावर तर ते ट्रोल झाले आहेतच पण त्यांना ‘द कपिल शर्मा शो’ मधून देखील काढून टाकण्यात आले आहे. त्याजागी आता अर्चना पुरण सिंग यांची वर्णी लागली आहे. आता मात्र सिद्धू यांना पुन्हा कपिलच्या शोमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता सलमान खान यासाठी प्रकरण शांत होण्याची प्रतीक्षा करतोय अशी माहिती सूत्रांची दिली आहे.

महाशिवरात्र : जाणून घ्या या दिवसाची शिवपूजा आणि शिवमहात्म्य

वादग्रस्त वक्तव्यानंतर सिद्धूंना ‘द कपिल शर्मा शो’मधून हटवा अन्यथा आम्ही शो बंद पाडू, अशी भूमिका प्रेक्षकांनी घेतली होती. यानंतर चॅनल सिद्धूंना काढावे की नाही, या संभ्रमात असताना खुद्द सलमानने सिद्धूंना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. निर्माता या नात्याने या प्रकरणात कुठलीही जोखीम पत्करायला सलमान तयार नव्हता. कारण ‘द कपिल शर्मा शो’चा टीआरपी नंबर एक वर पोहोचला होता. अर्चना पूरण सिंग यांना केवळ काही एपिसोडसाठी साईन करण्यात आले होते. यानंतर सिद्धू या शोमध्ये परत येणार आहेत. अशी माहिती सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नक्की काय म्हणाले होते सिद्धू 
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यात ४४ जवान शहीद झाले. त्यानंतर देशभर या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र, काही दिवसांपूर्वी पाकिस्तान वारी करुन आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी मात्र ‘काही लोकांसाठी देशाला जबाबदार धरू नका’ अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे नेटकरी सिद्धू यांच्यावर चांगलेच संतापले.
कपिलकडून सिद्धू यांची पाठराखण 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला होता,  “कलाकारांवर बंदी घालणे किंवा सिद्धू यांना शोमधून बाहेर काढणे हा समस्येवर उपाय असु शकत नाही. या प्रश्नावर काही ठोस तोडगा काढला पहिजे. जर केवळ सिद्धू यांना शो मधून काढून टाकण्याने हा प्रश्न सुटला असता तर ते स्वतःच हा शो सोडून गेले असते. आपल्याकडे आता तरुणांना भरकटवण्याचे काम सुरू झालंय. #BoycottSidhu, #Boycottkapilsharmashow असे हॅशटॅग चालवण्याचं काम त्यांना दिलं जातं. ज्यामुळे आसपासची परिस्थिती, ज्या प्रश्नांवर बोलायला हवे असे विषय या सगळ्यांपासून तरुणांचे लक्ष वेगळ्याच विषयांकडे वळवलं जातं. मला वाटतं आपण नेमकी समस्या काय आहे, त्यावर उपाय कसा शोधता येईल याचा विचार करायला पाहिजे.’