लग्नाच्या वयानंतर महिलांच्या आरोग्यावर काय परिणाम पडतो ? जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचे मत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    भारतात मुलींचे लग्नाचे वय १८ वर्षे निश्चित केले गेले आहे. यामागे अनेक कारणे आहेत. असे मानले जाते की, १८ व्या वर्षांत मुली शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिपक्व होतात. आरोग्य तज्ञही म्हणतात की, लग्नाच्या वयाचा महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच अधिकृत आकडेवारीनुसार, लवकर लग्न झाल्यामुळे माता आणि बाल मृत्यु दरात घट नोंदवली गेली आहे. वाढत्या वयासह महिलांमध्ये एनिमियाच्या तक्रारीही येऊ लागतात. गेल्या २० वर्षांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, एका वयानंतर महिलांमध्ये एनिमियाच्या तक्रारीत लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे.

आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, महिलांचे आरोग्य थेट लग्नाशी संबंधित आहे. कमी वयात स्त्रियांमध्ये जनजागृतीचा अभाव असतो. लहान वयात आई झाल्याने महिलांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. लहान वयात मुली त्यांच्या आरोग्याबाबत फारशा जागरूक नसतात. त्यांच्यावर खूप मानसिक दबाव देखील असतो. रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणतात की, कायद्याबरोबरच वैद्यकीयदृष्ट्या देखील असे मानले जाते की लग्नाच्या वेळी तरुणीला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या समज असणे आवश्यक असते. त्यामुळे लग्न किमान १८ व्या वर्षी झाले पाहिजे. तर मूल २० वर्षांअगोदर होऊ नये.

देशातील बर्‍याच भागात लवकर लग्न आणि लवकर बाळाला जन्म देण्याची रीत आहे. या सर्वामागे हेच कारण आहे की, तरुण असल्यापासूनच कुटुंब सुरू केले पाहिजे जेणेकरून संपूर्ण उर्जेसह मुलांचे संगोपन केले जाऊ शकेल. मात्र आरोग्याच्या दृष्टीने तज्ञ खूप जास्त वयात देखील लग्न करण्याच्या बाजूने नाहीत. आरोग्य तज्ञांचे मत आहे की, महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर एक-दोन वर्ष काम करा, स्वतःबद्दल आणि जगाबद्दल अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग लग्न करण्याचा निर्णय घ्या. या वयात स्त्रिया शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या लग्नासाठी तयार असतात.