ई-वाहनांशी संबंधित ‘हे’ आहेत गैरसमज; जे E-कार खरेदी करण्याचा निर्णय बदलू शकत नाहीत, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन : असं समजतात की, इलेक्ट्रिक वाहनांचा वेग इतर इंधनाच्या वाहनांपेक्षा फारच कमी आहे. परंतु सध्या बाजारात अशा बर्‍याच इलेक्ट्रिक कार आहेत ज्या ताशी वेग 160 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. यामध्ये ह्युंदाईच्या कोना इलेक्ट्रिक याबाबत कंपनीचा दावा असा आहे की, त्याची अधिकतम वेग 167 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. तर एमजी झेडएस ईव्ही कारचा वेग प्रति तास 140 इतका वेगवान आहे. बाजारात सर्वाधिक पसंतीस उतरलेल्या टाटा नेक्सन वाहनाचा सर्वांधिक वेग हा 120 किलोमीटर प्रति तास आहे.

इलेक्ट्रिक कारबद्दलची तिसरा मोठा गैरसमज असा आहे की, इलेक्ट्रिक कार जास्त दूर जाऊ शकत नाहीत. त्यांना वारंवार चार्ज करावे लागेल. परंतु हे सत्य नाही. अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज केल्यानंतर सुमारे 400 किलोमीटर पर्यंत आरामात जाऊ शकतात. हे त्याचप्रमाणे आहे, ज्याप्रमाणे आपण पेट्रोल किंवा डिझेल इंधन भरल्यानंतर त्या कारचा अनुभव घेतो. उदाहणार्थ, जर तुम्हाला दिल्लीहून साप्ताहिक सुट्टीदिवशी जयपूर किंवा चंदीगडला जायचे असेल तर आपण त्यास एक वेळ पूर्ण चार्ज केल्यानंतर आरामात जाऊन येऊ शकाल. त्याचप्रमाणे आपण इलेक्ट्रिक स्कूटर किंवा बाईकबद्दल देखील असेच आहे, एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 70 किलोमीटरपर्यंत जाऊन येऊ शकाल. याबात ह्युंदाई कंपनीचा दावा आहे की, त्यांची कोना कार एक वेळ चार्ज केल्यानंतर सुमारे 452 किमीपर्यंत जाऊ शकते. एमजीचे झेडएस ईव्ही हि कार 340 किमी आणि टाटा नेक्सन कार 312 किमी पर्यंत जाऊ शकतात.

लोकांमध्ये आणखी एक संभ्रम देखील आहे की, तो म्हणजे इलेक्ट्रिक कार महागड्या आहेत, परंतु जर आपण इतर कारच्या किंमतीचा विचार केला तर दीर्घकाळासाठी इलेक्ट्रिक कार स्वस्त वाटतील. उदाहरणार्थ, महिंद्रा अँड महिंद्राच्या इव्हेरिटो कारची किंमत बाजारात सुमारे 10 लाख रुपयांपासून सुरू होते, जी सामान्य हॅचबॅक कारच्या तुलनेत थोडी महाग दिसत आहे. परंतु सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान देत आहेत, त्यासह इलेक्ट्रिक कारवरील देखभाल आणि इंधन खर्चही सामान्य कारपेक्षा फारच कमी आहे. अशा परिस्थितीत, दीर्घकालीन वेळेचा विचार केल्याच ई कारची किंमत कमी वाटेल. इतकेच नव्हे, तर बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढल्यास त्यांची किंमत आणखी कमी होईल, अशी देखील शक्यता वर्तविली जात आहे.

इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित आणखी एक गैरसमज असा आहे की, ई कारच्या चार्जिंगला बराच वेळ लागतो, परंतु आपणास माहित आहे का?, आपल्या घरात 240 व्होल्टच्या स्विच बोर्ड आपली इलेक्ट्रिक कार रात्रभर रिचार्ज करू शकतो. इतकेच नव्हे तर, दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमधील रस्त्यांवर चार्जिंग स्टेशन बसविण्यात आलेली आहेत. जे केवळ अर्ध्या तासात तसेच एका तासामध्ये इलेक्ट्रिक कारला पूर्ण चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात.

आपण रेस्टॉरंटमध्ये दुपारचे जेवण किंवा डिनर जितक्या वेळेत करता तेवढ्या वेळत आपली कार चार्ज सहजरित्या होईल. इतकेच नाही तर काही शहरांत बॅटरी स्वॅपिंग केंद्रेही निर्माण झालेली आहेत. जिथे काही मिनिटांत तुमच्या कारची रिकामी बॅटरी बदलून फुल्ल बॅटरी चार्ज झालेली मिळेल. चंदीगडमध्ये इंडियन ऑईलने असे एक केंद्र सुरू केले आहे.

इलेक्ट्रिक कारशी संबंधित आणखी एक संभ्रम आहे, ई कारच्या बॅटरीची किंमत खूप जास्त आहे. त्या वारंवार बदलव्या लागतात. परंतु बर्‍याच कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीवर आठ वर्षांची वॉरंटी देत असतात. बॅटरी हि इतर कारच्या तुलनेत आपला इतर इंधन खर्च वाचवते. यामुळे दीर्घ कालावधीसाठी ई वाहनाची किंमत कमी होते. तर सामान्य कारवर कंपन्या काही लाख किलोमीटर किंवा कमाल 5 वर्षांपर्यंतची वॉरंटी देतात. त्या दृष्टीने, इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणे देखील एक चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे आता ई कारला अधिक ग्राहक पसंती देतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.