एक्सरसाईज केल्यामुळं केस गळतात किंवा टक्कल पडतो का ? जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अनेकांना केसगळतीची समस्या असते. काही लोक एक्सरसाईज करतात त्यांनाही ही समस्या असते. परंतु एक्सरसाईजमुळं केसगळती होते किंवा टक्कल पडतो का अशीही काहींना शंका आहे. याबद्दल आज माहिती घेऊयात.

3.5 कोची पुरुषांना ही समस्या
रिपोर्टनुसार भारतात 3.5 कोटी लेकांना ही समस्या आहे. फिटनेस इंडस्ट्रीतही असे अनेक लोक आहेत ज्यांना ही समस्या आहे किंवा टक्कल आहे.

खरंच एक्सरसाईजमुळं केसगळती होते का ?
तसं तर केसगळती होणं ही एक सामान्य बाब आहे. शरीरात डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं प्रमाणात असंतुलित झाल्यानं केसगळती होते. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढल्यानं यांचही प्रमाण वाढतं. बॉडी बिल्डर किंवा अ‍ॅथलिट्स टेस्टोस्टेरॉन बुस्टर किंवा सप्लिमेंट्सचा वापर करून टेस्टोस्टेरॉन हाय करतात. टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढल्यानं डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनचं प्रमाणही वाढतं आणि केसगळती होते.

लो कार्बोहायड्रेट हेही एक कारण
एका रिसर्चमध्ये सांगितलंय की, लो कार्ब डाएट घेण्यामुळंही केसगळती होते. वजन कमी करण्यासाठी लोक लो कार्ब खातात. यामुळं केस पातळ होणं किंवा केसगळतीची समस्या येते.

‘हे’ उपाय करा

टेस्टोस्टेरॉन बुस्टर किंवा स्टेरॉईड घेतल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर याच सेवन बंद करा.
वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे
आहार आणि लाईफस्टाईल बदलावी.