पोलिसांना कोरोना बाबतची नियमावली लागू नाही का?

पुणे : राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाच्या वतीने सर्वत्र कडक निर्बंध लादण्यात आले आहे तर प्रशासनाच्या वतीने राज्यात 144 कलम लागू करण्यात आले असल्याने पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊन गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यामुळे पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकञ आढळल्यास,तोंडाला मास्क न लावल्यास पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. परंतु नियम ,निर्बंध हे फक्त सर्वसामान्यच आहेत का ? पोलिसांना नाहीत का ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरुर पोलीस स्टेशन मध्ये दोन दिवसापूर्वी एका गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आणि त्या आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांकडून आरोपी सोबत फोटो काढण्यात आले आले. या फोटो मध्ये तब्बल ११ व्यक्ती तोंडाला मास्क न लावता, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता उभे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स,मास्क न वापणे ,जमावबंदी हे आदेश फक्त सर्वसामान्य लोकांनाच का ?पोलीस अधिकाऱ्यांना यामधून सुट आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे .

त्यामुळे आता या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख काय कारवाई करतात हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.