Pune News : पुण्यात मुक्या प्राण्यांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल, संतापाची लाट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट परिसरात भटक्या कुत्र्याला चिरडल्याने कार चालकावर गुन्हा दाखल झाला असताना समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भटक्या श्वानाला लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण करत असलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. इतका भयावह व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

माहितीनुसार, हा व्हिडीओ 25 फेब्रुवारीच्या रात्री दोन वाजताचा आहे. नाना पेठेत जखमी अवस्थेत श्वान पडलेले काही मुलांना दिसले. त्यांनी त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले. या श्वानाच्या मानेवर, पाठीवर व डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले आणि त्या श्वानाला घेऊन येणाऱ्या मुलांकडे चौकशी केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाना पेठेतील हलवाई चौकात हा श्वान गंभीर जखमी मिळाला आहे. मुलांनी येथील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास 25 ते 30 वयोगटातील दोन तरुणांनी श्वानाना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचे दिसून आले. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर प्राणी प्रेमीतून संताप व्यक्त केला जातोय. संबंधित तरुणाचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये.
समर्थ पोलीसांकडून आता तरुणांचा शोध घेतला जात आहे. या श्वानावर कोंढवा येथील प्राणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.