नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील कोलारडो राज्यातील जॉर्ज टाऊन शहराच्या महापौरपदाची नुकतीच निवडणूक पार पडली. परंतु ही निवडणूक इतर महापौरांच्या निवडणूकीपेक्षा वेगळी होती. या महापौर पदांच्या निवडणूकीत पार्कर नावाच्या श्वानाची निवड करण्यात आली. एवढेच नाही तर या श्वानाचा शपथविधी दिमाखात पार पडला. जॉर्ज टाऊन कम्युनिटी सेंटरमध्ये हा महापौर पदाचा शपथविधी सोहळा पार पडला.
या खास शपथविधी सोहळ्याच्या स्थानिकासह अनेक श्वान प्रेमींनी हजेरी लावली होती. पार्करला पोलीस आणि न्या. केलसी यांनी महापौर पदाची शपथ दिली. या समारंभात पदभार सांभाळण्यासाठी पार्कर टाय, कॅप, चष्मा अशा वेशभूषेत आला होता. या विशेष शपथविधी सोहळ्याचे फोटो क्लिअर क्रिक कौंटीच्या फेसबूक पेजवर शेअर केले गेले आहेत. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पार्कर हा सेलिब्रिटी श्वान आहे. त्याचे इन्सटाग्रामवर अकाऊंट देखील आहे आणि त्याला 16 हजारपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. पार्कर हा लवलँड स्की परिसराचा मॉस्कट आहे. याशिवाय तो रॉकी माऊंटनमधील एका गावातील थेरपी कॅम्पमध्ये देखील सहभागी झाला होता.