मारायला गेले कुत्र्याला, मेली वाघीण, ३ बछडे, चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कुत्र्याने आपले वासरु मारले, या रागातून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने मृत वारसावर थिमेट नावाचे विषारी औषध टाकून वासरु नाल्याजवळ फेकून दिले. हे वासरु खाल्याने वाघीण व तिच्या ३ बछड्यांचा मृत्यु झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वन विभागाने पांडुरंग तानबा चौधरी याला अटक केली आहे.

चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर वनक्षेत्रात ही घटना घडली होती. मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ एक वाघीण आणि दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. बछडे आठ ते नऊ महिन्याचे आहेत. मेटेपार गावालगत असलेल्या तलावाकाठी काही युवक जांभळे तोडण्यासाठी गेले असता त्यांना तेथे वाघिणीसह दोन बछडे मृतावस्थेत आढळले. त्यांनी तात्काळ ही माहिती शंकरपूरच्या पर्यावरणवादी मंडळाच्या वन्यजीवप्रेमीना दिली.

कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जवळच गायीचे एक वासरू मृतावस्थेत आढळून आले. या वासराचे दोन पाय तुटलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे या वाघिणीने व तिच्या बछड्यांनी या मृत वासराला खाल्ल्याने त्यांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त होत होता. त्या दिशेने तपास सुरु झाले. ते वासरु कोणाचे आहे, याची चौकशी केल्यावर पांडुरंग चौधरीचे नाव पुढे आले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने कुत्र्यांनी आपले वासरु मारल्याने त्यांना मारण्यासाठी आपण वासराच्या अंगावर विषारी औषध लावल्याची कबुली दिली. त्याच्या या कृत्याने वाघीण व ३ बछड्यांना मात्र आपला प्राण गमवावा लागला.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात