वैज्ञानिकांचा दावा : आता कुत्र्यांना देखील विळख्यात घेतोय ‘एड्स’

हिसार : वृत्तसंस्था – हिसारच्या लाला लाजपत राय युनिव्हर्सिटीच्या जीवशास्त्र विभागाच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, एड्सचा धोकादायक आजार मानवांव्यक्तिरिक्त कुत्र्यांमध्येही पसरत आहे. कुत्र्यांमध्ये हा आजार आढळल्यावर उपचार न मिळाल्यास काही दिवसातच त्यांचा मृत्यू होतो. कुत्री देखील एड्स पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहे.

लुवासच्या परजीवी विभागातील वैज्ञानिकांनी काही प्राण्यांच्या नमुन्यांची चाचणी केल्यानंतर दावा केला आहे की, एड्स पॉझिटिव्ह आढळले आहेत. शास्त्रज्ञांना दीर्घ संशोधनानंतर आढळले आहे की, कुत्री, मेंढ्या आणि कोल्ह्यांना एड्स एरलिचिया नावाच्या परजीवीमुळे होतो.

जगभरात ९० कोटी कुत्री आहेत. भारतात कुत्र्यांची संख्या ९ हजार लाख असल्याचे सांगितले जाते. हरियाणामध्ये जवळपास १९ लाख कुत्री आहेत. लुवासचे परजीवी विभाग प्रमुख डॉ. सुखदीप वोहरा आणि वैज्ञानिक डॉक्टर अनिल कुमार नेहरा, डॉ. स्नेहिल गुप्ता यांनी सांगितले की, आतापर्यंत परदेशी जातीच्या कुत्र्यांमध्ये एड्स आढळून आला आहे.

हे शास्त्रज्ञ म्हणतात की, हा आजार दक्षिण आफ्रिकेतील कुत्र्यांमध्ये अधिक आहे आणि आता तो अमेरिका आणि भारताच्या कुत्र्यांमध्ये पसरत आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भारतातील प्रत्येक राज्यात कुत्र्यांमध्ये एड्स आजाराच्या तक्रारी येत आहेत. हा रोग शरीरात सगळीकडे पसरतो आणि विषाणू रक्तात पोचल्यावर कुत्र्यावर परिणाम करतो. तीन ते चार दिवस उपचार न केल्यास कुत्र्यांचा मृत्यू होतो.

लुवासचे जीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुखदीप वोहरा म्हणतात की, एड्स पॉझिटिव्ह झाल्यानंतर प्राणी दुर्बल होऊ लागतात. त्यांचा शारीरिक विकासही पूर्णपणे थांबतो. नाकातून रक्त वाहू लागते. पोट आणि अंडाशय सुजतात, डोळे देखील लाल होतात.