बोटीत बसलं होतं ‘कुत्र’, पाण्यातून अचानक आली ‘डॉल्फिन’ आणि अशाप्रकारे केली ‘मैत्री’ व्यक्त, फोटोज् व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शोले या चित्रपटातील जय आणि वीरूच्या मैत्रीचे उदाहरण बर्‍याचदा दिले जाते. एक कुत्रा आणि एक डॉल्फिन सध्या अशाच एका मैत्रीचे उदाहरण दाखवत आहेत. कुत्रा आणि डॉल्फिन यांच्या मैत्रीचा असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही तुमच्या खास मित्राची आठवण येईल. या व्हिडिओमध्ये कुत्रा डॉल्फिनचे चुंबन घेताना दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कुत्रा आणि डॉल्फिन यांच्यातील या मैत्रीची कहाणी एक-दोन दिवसांची नसून ६ वर्ष जुनी आहे. जेव्हा कुत्रा फक्त ८ आठवड्यांचा होता, तेव्हा त्याची डॉल्फिनशी मैत्री झाली होती. त्यावेळी डॉल्फिन ४ वर्षांची होती. ही गोष्ट ऐकून थोडे आश्चर्य वाटले असेल, पण हे सत्य आहे. कुत्र्याचे नाव गनर व डॉल्फिनचे नाव डेल्टा आहे.

या फोटोंमध्ये पाहू शकता की, कुत्रा एका बोटीवर बसला असताना अचानक पाण्यातून डॉल्फिन येते आणि तोंड बाहेर काढते. डॉल्फिनला पाहिल्यावर कुत्र्याला आनंद होतो आणि तो तिला चाटायला लागतो. या दोघांचे फोटो सोशल मीडिया युजर्स खूपच लाईक करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, कुत्रा आणि डॉल्फिनची पहिली भेट फ्लोरिडा कीजमधील डॉल्फिन रिसर्च सेंटरमध्ये झाली होती. त्यानंतर दोघे मित्र झाले होते.

https://twitter.com/_woollyback/status/1273295000126750721

लोक कुत्रा आणि डॉल्फिनच्या या मैत्रीचे फोटो पाहून खूप आनंदित झाले आहेत आणि म्हणत आहेत की भिन्न परिस्थितीत जगणारे दोन प्राणी किती प्रिय मित्र आहेत. दोघेही एकमेकांना विसरले नाहीत.