इमानदार कुत्र्यामुळे पोलीस सर्च ऑपेरेशन करू शकले

वृत्तसंस्था : पोलिसनामा ऑनलाईन : इमानदार कुत्र्या मुळे पोलीस सर्च ऑपरेशन करू शकले. कुत्रा हा प्राणी इमानदार असतो आणि हा मनुष्यासोबत खूप प्रामाणिक असतो याचच एक उदाहरण म्हणजे. अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये एक कुत्रा त्याच्या मालका सोबत हायकिंगसाठी आला होता.

आणि त्याच्या मालकाचा घनदाट जंगलात पडून मृत्यू झाल्यामुळे तो त्याच्या मालका जवळ बसला होता. मालक आणि कुत्रा रोज सकाळी हायकींगसाठी जात असायचे. मालक नेहमी त्याच्या बायकोला न सांगता डेजीसोबत हायकिंगसाठी जात. पण ह्यावेळीस बराच अंधार झाला होता तो डेजीला घेऊन घरी आलेला नव्हता. म्हणून त्याच्या बायकोने पोलिसांना फोन करून तपास करायचा सांगितले.

पोलिसांना दुसऱ्या दिवशी ३ वाजता त्याची कार मिळाली. व १ तास नंतर कुत्रा भुंकायचा आवाज आला आणि सर्च टीम कुत्र्यचा भुंकायच्या आवाजाचा दिशेने गेले आणि तेंव्हा त्यांना तो मृत देह सापडला. ही पोस्ट Pierce County Sheriff’s Department ने शेअर केली आहे. पोलिसांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, डेजीसारख्या इमानदार प्राण्यामुळेच ते हे सर्च ऑपरेशन पूर्ण करु शकले.