मालकानं पुलावरून उडी मारून दिला जीव, कुत्रं 4 दिवस तिथंच पाहत होता वाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कुत्रा मानवा प्रति सर्वात विश्वासू प्राणी मानला जातो. लोक आपल्या पाळीव कुत्रांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्या प्रत्येक सुख-सुविधेची काळजी घेतात. मालकाशी कुत्र्याच्या निष्ठेचे उदाहरण चीनमध्ये दिसून आले जेथे मालकाने आत्महत्या केली आणि कुत्रा आपला मालक परत येईल या आशेने चार दिवस तिथेच वाट पाहत थांबला.

चीनमध्ये एका कुत्र्याने पाहिले की, त्याच्या मालकाने पुलावरून खाली उडी मारून आत्महत्या केली, परंतु तरीही तो त्याच पुलावरून चार दिवस बसला. कुत्र्याला वाटले की त्याचा मालक त्याच्याकडे परत येईल. जवळपास राहणार्‍या एका व्यक्तीने, चार दिवस पुलावर बसलेल्या कुत्र्याचा फोटो घेतला. कुत्र्याची मालकाशी असलेली निष्ठा पाहून त्या माणसाने कुत्र्याला दत्तक घेण्याचा विचार केला आणि त्याला पकडण्यास सुरवात केली. यानंतर कुत्रा त्या ठिकाणाहून पळाला.

स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने वुहान स्मॉल अ‍ॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनचे संचालक डु फॅन आता तो कुत्रा शोधत आहेत जेणेकरून त्याच्या राहण्याची व्यवस्था करता येईल. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कुत्रा 30 मे रोजी संध्याकाळी त्याच्या मालकाचा पाठलाग करत पुलाजवळ पोहचला जिथे त्याच्या मालकाने उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. मालकाच्या मृत्यूनंतरही कुत्रा त्या ठिकाणी चार दिवस बसला.