… म्हणून ‘या’ कुत्र्याचा पदवी देऊन सन्मान करण्यात आला. 

अमेरिका  : वृत्तसंस्था – प्राणी हे  माणसांपेक्षा हुशार असतात. हे आपण अनेक घटनेतून पाहतच असतो. आपल्या वेगवेगळ्या कामगिरीमुळे ते नेहमी कौतुकास पात्र होत असतात. अश्याच एका  कुत्र्याला  त्याच्या कामगिरी बद्दल अमेरिकेत चक्क पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ‘ग्रिफिन’असे या कुत्र्याचे नाव आहे. ब्रिटनी हाउले ही तरुणी  व्हील चेअर वरून उठू शकत नाही तिला केलेल्या मदतीसाठी या कुत्र्याचा सन्मान करण्यात आला आहे.

उत्तर कॅरोलाइना मध्ये विल्सन इथे राहणारी ब्रिटनी  हाउले ही व्हील चेअरच्या मदतीने चालते आणि तिला क्रॉनिक पेनची समस्या आहे. तिला चालता येत नाही. त्या वेळी या कुत्र्या ब्रिटनीला  पाहिजे ती  मदत केली.ही तरुणी वर्गात असताना  कोणत्याही वस्तूची अथवा कोणतीही मदत लागली की हा कुत्रा तिला मदत करत होता. जर तिला मोबाइल सापडत नसेल तर हा कुत्रा तिला मोबाइल शोधून द्यायचा. इतकेच काय तर जेव्हा ब्रिटनी इंटर्नशिपदरम्यान रुग्णांवर उपचार करत असायची तेव्हाही हा कुत्रा तिच्या आजूबाजूला असायचा.

ऑक्यूपेशनल थेरपीमध्ये मास्टर डिग्री पूर्ण केल्यावर शनिवारी क्लार्कसन विश्वविद्यालयात हाउले तिची डिग्री घेत होती. तेव्हाही हा ग्रिफिन नावाचा कुत्रा तिच्यासोबत होता. हाउले सोमवारी म्हणाली की, ‘कॉलेज सुरु झाल्यापासून हा कुत्रा तिच्यासोबत आहे. जे मी केलं ते सगळंच या कुत्र्यानेही केलं आहे’.

पोस्टडॅम न्यूयार्क स्कूलचे बोर्ड ट्रस्टी शनिवारी ‘गोल्डन रीट्रिवर’ या प्रजातीच्या ४ वर्षाच्या  कुत्र्याचा सन्मान करताना म्हणाले की, हाउलेच्या यशात या कुत्र्याने असाधारण असं योगदान दिलं आहे. सतत तिच्यासोबत राहून या कुत्र्याने तिची मदत केली. त्यांनी सांगितले की, ग्रिफिनने दरवाजा उघडण्यापासून, लाइट सुरु करण्यापर्यंत इशारा केल्यावर कोणत्याही प्रकारचं काम करुन देत होता. भलेही ही कामे फार मोठं वाटत नसली तरी हाउलेला भीषण वेदनेचा सामना करावा लागत असे तेव्हा ते तिच्यासाठी महत्त्वाचं होतं.

हाउले आणि ग्रिफिनने इंटर्नशिपदरम्यान नार्थ कॅरोलाइनाच्या फोर्ट परिसरात काम केलं. यादरम्यान त्यांनी चालण्या-फिरण्यात समस्या येणाऱ्या सैनिकांची तसेच गरजू रुग्णांची मदत केली.वेगवेगळ्या अडचणींचा सामना करणाऱ्या लोकांची मदत करणाऱ्या अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘सर्व्हिस डॉग’ म्हटले जाते.