मोकाट कुत्र्यांचा दोन बालकांवर हल्ला, दोघे जखमी ; मनपा आयुक्तांच्या घराजवळील घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिका आयुक्त श्री कृष्ण भालसिंग यांच्या घराजवळच मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षांचे बालक गंभीर जखमी झाले. तसेच दुसर्‍या घटनेत अकरा वर्षाची मुलगी जखमी झाली आहे. एका तासाच्या आत झालेल्या दोन घटनांमुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज सायंकाळी भिस्तबाग चौक व पाईपलाईन रोड परिसरात या घटना घडल्या.

याबाबत माहिती अशी की, पाईपलाईन रोडलगत कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील नंदनवन कॉलनीत काही मोकाट कुत्र्यांनी एका चार वर्षीय बालकावर हल्ला केला. यात अवधूत गायकवाड चार वर्षांचे बालक जखमी झाले. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. याच नंदनवन कॉलनीत मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांचे निवासस्थान अाहे.

दुसरी घटना भिस्तबाग चौकात घडली. यात एका कुत्र्याने अकरा वर्षीय मुलीवर हल्ला करून तिला चावा घेतला. दुर्गा पिंपळे हे सदर मुलीचे नाव आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.

 

आरोग्याच्या किरकोळ समस्यांवर करा ‘हे’ नैसर्गिक उपचार

‘या’ कारणांमुळे येऊ शकतो ‘अकाली बहिरेपणा’, अशी घ्या काळजी

केसांचे नुकसान का होते ? जाणून घ्या या समस्येमागील कारणे

आधी एक भुमिका आणि खासदार झाल्यावर एक, इम्तियाज जलीलजी, हे वागणंं बरंं न्हवं !

आदिवासींसाठी स्वतंत्र आरोग्य संस्था असायला हवी