गणेशोत्सवात डॉल्बी लावणाऱ्यांची गय नाही : सांगली पोलीस अधीक्षकांचा इशारा

तासगाव : पोलीसनामा ऑनलाईन

कायदा व सुव्यवस्था राखणे, हे फक्त आमचेच काम नाही. ही समाजाच्या प्रत्येक घटकाची व तरुणांचीही तेवढीच जबाबदारी आहे. नियमावलीनुसार उत्सव साजरे केल्यास प्रशासन तुमच्या आनंदाच्या आड येणार नाही. पारंपारिक वाद्ये वाजवल्यास आपल्या लोकांना प्रोत्साहन मिळेल. लोकांच्या हाताला काम मिळेल. परंतु, शासनाचे नियम मोडून डॉल्बी लावल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा सांगलीचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिला आहे. मंगळवारी तासगाव येथे आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते.
[amazon_link asins=’B07B6SN496,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’51cf698c-b05b-11e8-9359-a7e57356dc28′]

सुहेल शर्मा म्हणाले, लोकमान्य टिळकांनी सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. मात्र सध्या या सणाचे पावित्र्य राखण्यापेक्षा त्याचा त्रास कसा होईल, याकडे समाजकंटकांचे लक्ष असते. त्यामुळे अशा समाजकंटकांचा त्रास कोणाला होणार नाही, याची काळजी व सुरक्षेसाठी तरुणांनी स्वतःच गावागावात पोलिस व्हावे, असे आवाहन पोलिस अधिक्षकांनी केले. या बैठकीला तहसीलदार दीपक वंजाळे, पोलिस उपअधिक्षक अशोक बनकर, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक अजय सिंदकरउपस्थित होते.

नियमावलीनुसार उत्सव साजरे केल्यास प्रशासन तुमच्या आनंदाच्या आड येणार नाही. पारंपारिक वाद्ये वाजवल्यास आपल्या लोककला जगतील, लोकांच्या हाताला काम मिळेल. शाडूच्या मूर्ती वापरून पर्यावरणाची हानी कशी कमी करता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे शर्मा म्हणाले.
[amazon_link asins=’B075FY4RWK,B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’57a03688-b05b-11e8-86ef-872fc5650ec7′]

उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलिस उपअधिक्षक बनकर म्हणाले, भारत हा कृषिप्रधान देश आहे. तासगांव तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना गती मिळावी शेतकर्‍यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे, या करिता डॉल्बीला फाटा देऊन आपला खारीचा वाटा म्हणून जलसंधारणाच्या कामांना हा निधी द्या. गुलाल उधळण्याऐवजी फुले उधळा. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फुलांना दर मिळेल. याबैठकीनंतर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी तासगावच्या रथोत्सवाच्या मार्गाची तसेच गणपती विसर्जनाच्या प्रमुख मार्गांची पाहणीही केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी