किती घसरतो बाबा…थांब की आता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भारतीय रूपयाची घसरगुंडी काही केल्या थांबण्यास तयार नाही. यामुळे अर्थतज्ज्ञही चिंता व्यक्त करत आहेत. गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा डॉलरच्या तुलनेत रूपया ७०.८६ प्रति डॉलर एवढा खाली येऊन १८ पैशांनी घसरला. बुधवारी ही घसरण ७०.७७ वर थांबली होती. चलन व्यावसायिकांच्या मते आयातदार आणि रिफायनरी क्षेत्राकडून डॉलरची मागणी वाढल्याने रूपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत आहे. केवळ भारतच नव्हे तर दुसऱ्या देशांच्या चलन तुलनेतही डॉलर मजबूत झाला आहे.

[amazon_link asins=’B01M7RLQ27,B07B69M57C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cbe2166d-ac21-11e8-a816-59bc5d9b2251′]

या वर्षात भारतीय रूपयात तब्बल १० टक्के घसरण झाली आहे. दुसऱ्या आशियाई चलनांच्या तुलनेत भारतीय रूपया खुपच खाली आला आहे. जानेवारी महिन्यापासून रूपयाचे मुल्य डॉलरच्या तुलनेत सातत्याने घसरत आहे. मागील १८ वर्षातील ही सर्वात मोठ्या कालावधीची घसरण असल्याचे मत अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

ऑगस्ट महिन्यात रूपयाची साधारण घसरण अशी झाली : ३० ऑगस्ट ७०.८२, २९ ऑगस्ट ७०.६५, १६ ऑगस्ट ७०.४०, १४ ऑगस्ट ६९.९३, १३ ऑगस्ट ६९.९३ अशी होती. तर २९ ऑगस्ट ४९ पैसे, १३ ऑगस्ट ११० पैसे अशी दोन वेळा मोठी घसरण झाली आहे.

रूपयाची सातत्याने घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढू शकतात. कारण भारत आपल्या गरजेसाठी ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्रुड ऑइल आयात करतो. ही आयात करण्यासाठी डॉलरमध्ये व्यवहार करावा लागतो. या घसरणीमुळे पदरेशी पर्यटन, निवास आणि शिक्षण महाग होते. कारण यासाठीही डॉलरमध्ये पैसे भरावे लागतात. तसेच विमान कंपन्यांनाही रूपयाच्या घसरणीमुळे नुकसान होते. या कंपन्यांना दुसऱ्या देशांकडून विमान भाड्याने घेण्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागते. याउलट रूपयाच्या घसरणी आयटी आणि फार्मा कंपन्यांना फायदा होऊ शकतो. कारण या क्षेत्रांचा सर्वाधिक व्यवहार हा निर्यातीवर अवलंबून असतो.

पुणे आणि तेलंगणा पोलिसांकडून विद्रोही कवी वारवर राव यांच्या कन्येच्या घरीही छापे

जाहिरात