Birthday SPL : डॉली बिंद्रानं ‘खिलाडी’ अक्षयच्या सिनेमातून केला होता डेब्यू ! राधे मां वर केले होते शोषणाचे आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कायमच वादात राहणाऱ्या अ‍ॅक्ट्रेस डॉली बिंद्रा (Dolly Bindra) नं आजच आपला वाढदिवस साजरा केला आहे. डॉली बिग बॉस 4 मध्ये झळकली आहे. घरातील भांडणांमुळं तिनं खूप अटेंशन घेतलं होतं. घराच्या बाहेरही तिचे काही विवाद खूप चर्चेत राहिले.

राधे मां वर केले होते आरोप

डॉली बिंद्रानं राधे मांवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. 2015 साली डॉली बिंद्रानं मीडिया समोर सांगितलं होतं की, राधे मां नं तिला एका अनोळखी सोबत शारीरिक संबंध ठेवायला सांगितले होते.

याव्यतिरीक्त डॉलीनं टल्ली बाबावर देखील लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. डॉली म्हणाली होती की, टल्ली बाबा राधे मां च्या क्लोज आहेत. याशिवाय त्यांच्या विरोधात 6 कलमंही लावण्यात आली आहेत.

शेजाऱ्यांनी दाखल केली तक्रार

डॉली बिंद्राच्या शेजाऱ्यांनीही तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. डॉलीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात डॉली शेजाऱ्यांसोबत भांडताना दिसत होती.

सोसायटीमधील लोकांनी डॉलीवर शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. याशिवाय एका जीम कर्मचाऱ्याला धमकावणं आणि त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचाही तिच्यावर आरोप झाला होता.

डॉलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिन सलमान खानच्या दबंग 3 मध्ये काम केलं आहे. डॉली बिंद्रानं अवघ्या 18 व्या वर्षी अभिनेता अक्षय कुमारच्या खिलाडियों का खिलाडी या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिनं बिच्छू, खिलाडी 420, गदर अशा सिनेमात काम केलं. 2010 साली तिनं बिग बॉस 4 मध्ये एन्ट्री घेतली होती.