Dolly Khanna Portfolio | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अजूनही तेजीची शक्यता, 3 महिन्यात मिळू शकतो 20% रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये (Dolly Khanna Portfolio) समावेश असलेल्या बटरफ्लाय गांधीमती अप्लायन्सेस लिमिटेड (Butterfly Gandhimathi Appliances) चा 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stocks) मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या एका वर्षात हा शेयर रु. 560 वरून रु. 1,380 पर्यंत वाढला आहे त्यामुळे शेयरधारकांना 150 टक्के रिटर्न मिळाला आहे. (Dolly Khanna Portfolio)

 

22% रिटर्न एका महिन्यात दिला
या शेअरने आठवड्यात 7 टक्के आणि गेल्या एका महिन्यात 22 टक्के रिटर्न दिला आहे. हा मल्टीबॅगर शेयर गेल्या 6 महिन्यांत 736.50 रुपयांवरून 1380 रुपयांपर्यंत वाढला आहे. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 90% रिटर्न दिला आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, डॉली खन्ना (Dolly Khanna share) यांच्या शेअर पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेला मल्टीबॅगर स्टॉक तेजीत आहे आणि पुढील 3 महिन्यांत तो 1,650 रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. अशा प्रकारे 3 महिन्यांत तो बाजारभावापेक्षा सुमारे 20 टक्के रिटर्न देऊ शकते. (Dolly Khanna Portfolio)

 

पुढे सुद्धा तेजीची शक्यता
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया म्हणाले, हा मल्टीबॅगर स्टॉक पुढेही तेजीत राहील अशी अपेक्षा आहे. अल्प मुदतीसाठी त्याचे लक्ष्य रु. 1500 आहे तर रु. 1320 च्या पातळीवर स्टॉप लॉस ठेवण्यास विसरू नका. बगाडिया यांनी असेही सांगितले की ज्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे त्यांनी तो रु. 1,320 च्या स्टॉप लॉससह ठेवावा.

1650 च्या टार्गेटसाठी करा होल्ड
जीसीएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रवी सिंघल म्हणाले, दीर्घकालीन गुंतवणूकदार सध्याच्या किंमतींवर हा मल्टीबॅगर स्टॉक खरेदी करू शकतात आणि रु. 1,300 च्या वर खरेदी करणे सुरू ठेवू शकतात. तुम्ही 1,600 ते रु. 1,650 च्या टार्गेटसह 3 महिन्यांसाठी तो होल्ड करू शकता. मात्र रु. 1,250 चा स्टॉपलॉस सेट करायला विसरू नका.

 

Butterfly Gandhimathi ही किचन आणि इलेक्ट्रिक उपकरणांची भारतातील आघाडीची उत्पादक आहे.
कंपनी Butterfly ब्रँड अंतर्गत आपली उत्पादने विकते. LPG stoves आणि टेबल टॉप वेट ग्राईंडर, मिक्सर ग्राईंडर आणि प्रेशर कुकरमध्ये ही कंपनी मार्केट लीडर आहे.
गेल्या 3 वर्षांत, कंपनीने ऑनलाइन व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित केले आहे, ज्यामुळे तिच्या महसुलात वाढ झाली आहे.

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Dolly Khanna Portfolio | dolly khanna portfolio multibagger stock is still in uptrend experts see 20 percent rise in near term

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

 

Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का