Video : ‘कोरोना’ लशीसाठी ‘या’ अभिनेत्रीनं दिले कोट्यवधी रुपये !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरस (Coronavirus) ला आळा घालण्यासाठी जगभर विविध प्रकारच्या कोरोना लशींवर (Corona Vaccine) काम सुरू आहे. असंही म्हटलं जात आहे की, कोरोना लशीच्या शर्यतीत मॉडर्ना (Moderna) कंपनीची लस सर्वांत पुढं आहे. या लशीच्या संशोधनासाठी अ‍ॅक्ट्रेस डॉली पार्टन (Dolly Parton) हिनं 1 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 7 कोटी रुपयांची मदत केली आहे. या लशीच्या पहिल्या टप्प्यातील संशोधन जेव्हा सुरू होतं तेव्हा डॉलीनं ही मदत केली होती. या कामगिरीसाठी डॉलीचं जगभरातून कौतुक होताना दिसत आहे.

या लशीवर जे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत, त्यांनी या लशीचं श्रेय डॉलीला दिलं आहे. या स्तुतीनंतर डॉलीही खूप खूश झाली आहे. तिनंही एका मुलाखतीत सर्वांचे आभार मानले आहेत.

एका मुलाखतीत बोलताना डॉली म्हणाली, आज मी खूप खूश आहे. कुठलंही संशोधन करताना संशोधकांना आर्थिक मदतीची गरज असते. आणि मी माझं कर्तव्य पार पाडलं आहे. आज जगाला कोरोना सोबत लढण्यासाठी लशीची गरज आहे. या लशीच्या निर्मितीत मी माझं योगदान देऊ शकले याचा मला आनंद आहे.

You might also like