नाईट शिफ्टला निघालेल्या डोंबिवलीच्या ‘त्या’ 3 नर्स परतल्याच नाहीत 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीला जोडणारा हिमालया पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये डोंबिवलीच्या तीन परिचारिकांनी आपले प्राण गमावले. अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे अशी त्यांची नवे असून त्या मुंबईच्या गोकुळदास तेजपाल अर्थात जीटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या.

सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर पूल पडल्याचं समजताच जीटी हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या सुश्रुषेसाठी सज्ज झालं. मात्र, याच हॉस्पिटलला त्यांच्याच नर्सचे मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आली.

जीटी रुग्णालयातील एका वरिष्ठ नर्सिंग स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि भक्ती शिंदे रात्री ८ वाजता नाईट शिफ्टला येण्यासाठी निघाल्या होत्या. तिघीही जणी डोंबिवलीला राहत असल्याने नाईट शिफ्ट असल्यावर त्या एकत्रच प्रवास करायच्या.

अपूर्वा प्रभू यांचे पती अभय यांनी टीव्हीवर अपघाताची बातमी पाहिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. ‘ट्रेन पकडल्यावर मी तिच्याशी फोनवरही बोललो होतो. तिच्यासोबत भक्ती आणि रंजना या दोघी स्टाफही होत्या’ असं अभय यांनी सांगितलं. ‘टीव्हीवर तिचं नाव दिसताच मी तिला फोन करायला सुरुवात केली. पण तिच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता’ असं सांगत अभय प्रभू भावविवश झाले. अपूर्वा आणि रंजना यांना जीटी रुग्णालयात, तर भक्ती शिंदे यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आलं.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले.

ह्याही बातम्या वाचा-

धक्कादायक ! वीट कामगाराला खायला लावली ‘विष्ठा’ 

कोंढव्यातील प्लॉस्टिकच्या गोडावूनला भीषण आग ; गोडावूनसह १ रिक्षा, १ स्कुलव्हॅन भस्मसात 

‘त्या’ प्रकरणी महापालिका, रेल्वे विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मशिदीमध्ये गोळीबार ; ६ जणांचा मृत्यु  

पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा 

You might also like