Dombivli Crime | किरकोळ कारणावरुन शेजाऱ्यांत तुंबळ हाणामारी; हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

डोंबिवली न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Dombivli Crime | डोंबिवली येथील एका सोसायटीमधील शेजाऱ्यांत किरकोळ कारणावरुन वाद निर्माण (Dombivli Crime) झाला. हाच वाद उफाळून तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. या घटनेवरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित चौघांना पोलिसांनी अटक (Arrest) देखील केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेतील देसले पाडा परिसरातील साई इन्कल्यू (Sai Enclave) या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने इमारतीच्या एका मजल्यावर घाण केली.
तर दुसऱ्या एका महिलेने या कारणावरून त्या महिलेशी वाद घातला.
ज्या महिलेचा कुत्रा होता तिने साफसफाई केली मात्र, नंतर हा वाद वाढला.
त्यानंतर याच कारणावरून सोसायटीमधील शेजारी आपापसात भिडले.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यांनतर महिलांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती त्यात काही पुरुष देखील सामील झाले.

दरम्यान, या हाणामारीचा एक व्हिडीओ (Video) उघडकीस आला आहे.
या हाणामारीचा व्हिडीओ समाज माध्यमावर जोरदार प्रसारित होत आहे.
दरम्यान, मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणावरून एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title : Dombivli Crime | dombivli free style fight among society members in desale pada video goes viral

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Breast Milk | ‘या’ 10 कारणांमुळे ‘ब्रेस्टमिल्क’ची निर्माण होते कमतरता, बाळाला नाही मिळत पुर्ण पोषण; जाणून घ्या

Chandrakant Patil | .मुख्यमंत्र्यांचा ‘खास’ माणूस ‘ईडी’च्या रडारवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितलं नाव

MLA Atul Bhatkhalkar | अतुल भातखळकर यांना अटक; BJP आमदार म्हणाले – ‘पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करणार’