ऑस्टेलियातून आलेल्या 47 वर्षीय महिलेचा डोंबिवलीत मृत्यु ! ‘कोरोना’ची तपासणीच नाही केली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑस्ट्रेलियाहून डोंबिवलीत आलेल्या महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यु झाला आहे. या महिलेला कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे जाणवू लागली होती. परंतु, तिने तपासणीच करुन घेतली नव्हती.

डोंबिवलीतील ही ४७ वर्षाची महिला  ऑस्ट्रेलियातून ११ मार्चला परत आली होती. त्यानंतर तिला २५ मार्चपासून त्रास होऊ लागला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी ही महिला एका हॉस्पिटलमध्ये गेली होती. तेथे तिला कस्तुबरा हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र ती कस्तुरबाला न जाता पुन्हा घरी आली. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या महिलेचा मृत्यु झाला.

महिलेच्या घरी पती, बहिण आणि बहिणीचा मुलगा आहे. आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकार्‍यांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान, या महिलेला कोरोनाची लागण झाली होती का नाही, हे तिचा नमूना घेण्यात आला नसल्याने स्पष्ट झालेले नाही.