Dombivli Gangrape Case | डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून वापर

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन –  Dombivli Gangrape Case | येथील १५ वर्षीय सामूहिक बलात्कार प्रकरणात (Dombivli Gangrape Case) रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आरोपींनी कंडोम (condom) ऐवजी प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्याचे समोर आले असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली आहे. पीडितेचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून मुख्य आरोपी वापर करत होता. त्याने पीडितेला व्हिडिओची धमकी देत मित्रांच्या स्वाधीन केले. महत्त्वाचे म्हणजे तिच्या अब्रूची किंमत ५०० रुपये लावल्याची माहितीही समोर आली आहे.

डोंबिवली पूर्वेकडील (Dombivli East) नांदीवली (nandivali), देसलेपाडा (desale pada dombivli east), वडवली (vadavali), मुरबाड (murbad) येथील फार्म हाऊस, कोळेगाव, बदलापूर (badlapur) सर्कल याठिकाणी गेली नऊ महिने पीडितेवर अत्याचार (Dombivli Gangrape Case) करण्यात आले. तिला कधी दारू, हुक्का तर कधी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केले जात होते. दरम्यान मार्च महिन्यात एका ठिकाणी तिच्यावर तब्बल १५ जणांनी बलात्कार केला. यावेळी मुख्य आरोपीस दोघांनी प्रत्येकी ५०० रुपये दिल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मुख्य आरोपीकडून तिला बोलावले जायचे त्यावेळीही अशाच प्रकारे तिच्या अब्रूची किंमत लावली जायची.

 

आणखी दोन आरोपींना अटक

या घटनेत रविवारपर्यंत ३१ नराधमांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत. त्यांची रवानगी भिवंडीतील
बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या अत्याचार प्रकरणात एकूण ३३ आरोपी आहेत. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत २६ जणांना अटक केली. तर शुक्रवारी तिघांना जेरबंद करण्यात आले.

 

Web Title : Dombivli Gangrape Case | dombivli gang rape case accused taken money 500 rs police investigating case crime

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Stock Market | शेयर बाजारातून कमावण्याची संधी ! 70 आयपीओ रांगेत, 28 कंपन्यांनी जमवले 42000 कोटी

Home Loan Tips | पहिल्यांदा घर खरेदी करणार्‍यांसाठी अतिशय कामाच्या आहेत ‘या’ होम लोन टिप्स, तुम्हीही जाणून घ्या

Gold Price Update | सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! 27060 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे नवीन दर