आता 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास महागणार, सरकारनं 16 टक्क्यांपर्यंत वाढवले भाडे; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात एकीकडे महागाईमुळे जनता त्रस्त असताना आता दुसरीकडे येत्या 1 जूनपासून देशांतर्गतत विमान प्रवास Air travel महागणार आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मर्यादा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली आहे. येत्या 1 जूनपासून हे नवे दर लागू होणार आहेत. . त्यामुळे 1 जूनपासून देशांतर्गत विमान प्रवास करताना आता प्रवाशांच्या खिशावर अधिकचा ताण पडणार आहे.

देशात थैमान घातलेल्या कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत हवाई प्रवास Air travel करणा-यांची संख्या कमी झाली. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पन्न घटले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विमान कंपन्यांना फायदा होणार आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या आदेशानुसार 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 1 जूनपासून 2, 600 रुपये आकारले जातील. सध्या या प्रवासासाठी 2,300 रुपये दर आहे. तसेच 40 ते 60 मिनिटांच्या प्रवासासाठी 2900 रुपये मोजावे लागत होते. परंतु 13 टक्के वाढ केल्याने आता 3,300 रुपये मोजावे लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय विमान सेवा 30 जूनपर्यंत रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केलेली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण आता 30 जूनपर्यंत रद्द ठेवण्यात येणार असल्याची माहिती DGCA ने दिली आहे. भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात जाणाऱ्यांसाठीची विमान 30 जूनपर्यंत बंद राहणार आहे.

असा आहे नवीन दर
60-90 मिनिटे 4,000
90-120 मिनिटे 4,700
120-150 मिनिटे 6,100,
150-180 मिनिटे 7,400
180-210 मिनिटे 8,700

Also Read This : 

दलित समाजाबद्दल जातीवाचक वक्तव्य; ‘तारक मेहता’ फेम अभिनेत्रीवर FIR

Video : पुण्यात नाकाबंदीमध्ये ट्रॅफिक पोलिसानं दुचाकी थांबवली ! दुचाकीस्वारानं फरफटत नेल्यानं पोलिस हवालदार जखमी; व्हिडीओ CCTV मध्ये कैद

राज्यातील ‘या’ 21 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट जास्त; 15 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ वाढणार