दिल्लीहून पहिलं विमान पुण्यात उतरले, 2 महिन्यांनंतर देशांतर्गत विमान सेवा सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊनमध्ये बस, रेल्वेबरोबरच विमान सेवा बंद करण्यात आली होती. आजपासून देशांतर्गत विमान सेवा सुरु करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सशर्त परवानगी दिल्यानंतर देशातील पहिले विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांनी पुण्यासाठी उड्डाण घेतले. ते तासाभराने पुण्यात सुरक्षितपणे उतरले. प्रवासादरम्यान नागरिकांच्या मनात भिती असली तरी ते उत्साही दिसत होते. इंडिगोचे हे विमान होते.

पुण्यातून आज दिवसभरात १७ विमाने आकाशात भरारी घेणार आहेत. दिल्ली, चेन्नई, कोची, चंदीगड, बेंगळुरु, अहमदाबाद, जयपूर आणि हैदराबाद येथे ही उड्डाणे होणार आहेत. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर गेल्या दोन दिवसांपासून त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. प्रवासी आल्यानंतर त्यांची थर्मल चाचणी केली जाणार आहे. तसेच बैठक व्यवस्थेत एका आड एक खुर्च्यांवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  विमान सेवा सुरु झाल्याने आता लोहगाव विमानतळावर येणार्‍या व येथून जाणार्‍या प्रवाशांसाठी कॅब व खासगी वाहनांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परवानगी दिली आहे.

मुंबईहून २५ विमानांचे उड्डाण होणार आहे. दिल्लीतील विमानतळावरुन ३८० विमाने चालविली जाणार आहे. येथून १९० विमाने उड्डाण घेणार आहेत