नवी दिल्ली : विमान प्रवास पुन्हा महाग होत आहे. सरकारने विमान प्रवास भाडे किमान 5 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सरकारने प्राईस बँड 10 ते 30 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी किमान भाडे 10 टक्के आणि कमाल भाडे 30 टक्के करण्यात आले होते. आता प्राईस बँडमध्ये किमान भाडे 5 टक्के वाढवण्यात आले आहे. हे एप्रिलच्या अखेरपर्यंत लागू राहील. एटीएफ म्हणजे विमानाच्या इंधनाचे दर वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही माहिती एव्हिएशन मिनिस्टर हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून दिली आहे. त्यांनी 100 टक्के क्षमतेसह एयरलाईनच्या संचालनाबाबत म्हटले की, जर रोजच्या आधारवर पॅसेंजरची संख्या 35 लाखांच्या पुढे गेली तर एयरलाईनला 100 टक्के क्षमतेसह ऑपरेशनची परवानगी मिळेल. मात्र, एक महिन्यात किमान 3 वेळा असे होणे आवश्यक आहे. कोरोनाच्या नंतर जेव्हा डोमेस्टिक एयर सर्व्हिस सुरु झाली होती तेव्हा प्रवासाला लागणार्या कालावधीच्या आधारावर संपूर्ण देशाच्या रूटला 7 कॅटेगरीमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक कॅटेगरीसाठी मिनिमम आणि मॅक्सिमम भाडे ठरवण्यात आले होते.
हे भाडे इकोनॉमी क्लाससाठी आहे, सोबतच यामध्ये यूजर्स डेव्हलपमेंट फी, पॅसेंजर सिक्युरिटी फी आणि जीएसटीचा समावेश आहे. एव्हिएशन मिनिस्ट्रीने 25 मे 2020 मध्ये डोमेस्टिक एयर सर्व्हिसची परवानगी दिली होती. सध्या सर्व एयरलाईनला 20 टक्के सीट सरासरी भाड्यापेक्षा कमीने विकाव्या लागतात.
फेब्रुवारीमध्ये वाढ केल्यानंतर भाडे
1. पहिली कॅटेगरी 40 मिनिटांपर्यंत विमान प्रवासाची आहे. तिचा प्राईस बँड 2200-7800 रुपये आहे.
2. दुसरी कॅटेगरी 40-60 मिनिटांची आहे. यासाठी प्राईस बँड 2800-9800 रुपये आहे.
3. तिसरी कॅटेगरी 60-90 मिनिटांची आहे. यासाठी प्राईस बँड 3300-11700 रुपये आहे.
4. चौथी कॅटेगरी 90-120 मिनिटांची आहे. यासाठी प्राईस बँड 3900-13000 रुपये आहे.
5. पाचवीं कॅटेगरी 120-150 मिनिटांची आहे. यासाठी प्राईस बँड 5000-16900 रुपये आहे.
6. सहावी कॅटेगरी 150-180 मिनिटांची आहे. यासाठी प्राईस बँड 6100 ते 20400 रुपये आहे.
7. आठवीं कॅटेगरी 180-210 मिनिटांची आहे. यासाठी प्राईस बँड 7200-24200 रुपये आहे.