देशांतर्गत विमानसेवेच्या तिकीटांचे दर 30 टक्क्यांनी वाढले, जाणून घ्या आता किती होतील दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरानंतर आता विमानप्रवासही महाग झाला आहे. विविध रुटसाठी नियोजित केलेल्या विमान तिकिटाच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशांतर्गत विमानप्रवासाचे तिकिट 30 टक्क्यांनी महागले आहे.

सरकारने दिलेल्या आदेशानुसार आता तुम्हाला देशांतर्गत विमान प्रवास करताना खिशाला कात्री लागणार आहे. विमान कंपन्यांनी विमान तिकिटावर किमान 10 टक्के आणि कमाल 30 टक्क्यांची वाढ केली आहे. या नव्या प्राईस बँडनुसार, दिल्ली-मुंबई या मार्गावर इकोनॉमी क्लासमध्ये आता एका मार्गाचे तिकीट दर 3,900 ते 13,000 रुपयांच्या रेंजमध्ये असेल. यापूर्वी हेच दर 3,500-10,000 रुपयांच्या रेंजमध्ये होते. पण आता यामध्ये वाढ झाली आहे.

दरम्यान, या नव्या दरात विमानतळाचा युजर डेव्हलप्मेंट शुल्क, प्रवासी सुरक्षा शुल्क (देशांतर्गत मार्गावर 150 रुपये) आणि GST चा यामध्ये समावेश आहे. याशिवाय, प्री- कोविड लेवलचा विचार करता 80 टक्के क्षमतेची मर्यादा 31 मार्च, 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

प्रवाशांना बसणार फटका
देशात वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता विमान तिकिटाच्या वाढणाऱ्या दराचा मोठा फटका बसणार आहे. यापूर्वी देशांतर्गत विमान प्रवास किमान 3,500 रुपयांमध्ये करता येत होता पण आता विमान प्रवास महाग होणार आहे.

विमान प्रवासात GST चाही समावेश
नव्याने लागू होत असलेल्या तिकिट दरामध्ये प्रवासी सुरक्षा शुल्कासह GST चा समावेश आहे.