Domestic LPG Consumers | LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी ! वर्षभरात केवळ 15 सिलिंडरच मिळणार, महिन्याचा कोटा सुद्धा ठरला!

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी ग्राहकांना (Domestic LPG Consumers) आता सिलिंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. आता नवीन नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. त्याचबरोबर एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे (Domestic LPG Consumers). कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकत नाही. आत्तापर्यंत घरगुती विना-अनुदानीत कनेक्शन (Non Subsidy Connection) धारकांना हवे तेवढे सिलिंडर मिळू शकत होते (LPG News).

या तक्रारींच्या आधारावर घेतला निर्णय

डिस्ट्रिब्युटर्सने दिलेल्या माहितीनुसार रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. हे पाऊल यासाठी उचलण्यात आले, कारण बर्‍याच काळापासून विभागाकडे अशा तक्रारी येत होत्या की घरगुती विनाअनुदानित सिलिंडर कमर्शियलपेक्षा स्वस्त असल्याने तेथे वापरले जात आहेत.

अनुदानित लोकांना फक्त 12 सिलिंडर

मिळालेल्या माहितीनुसार, हे बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांना लागू करण्यात आले आहेत. अनुदानित घरगुती गॅससाठी नोंदणी केलेल्यांना वर्षभरात फक्त 12 सिलिंडर मिळतील. यापेक्षा जास्त गरज असल्यास अनुदान नसलेले सिलिंडरच घ्यावे लागतील. (Domestic LPG Consumers)

संख्या 15 पेक्षा जास्त असू शकत नाही

रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर महिन्यात फक्त दोनच सिलिंडर मिळणार आहेत.
मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही संख्या एका वर्षात 15 पेक्षा जास्त असू शकत नाही.
जर एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल तर त्याला त्याचा पुरावा देत ऑईल कंपनीच्या
अधिकार्‍याची परवानगी घ्यावी लागेल. तरच अतिरिक्त रिफिल मिळू शकेल.

Web Title :- Domestic LPG Consumers | lpg domestic cylinders rationing 15 per year maximum 2 per month know new rules

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Accident News | हडपसरमध्ये भीषण अपघात ! मिक्सर कंटेनरने 4 रिक्षा आणि कारला दिली धडक; 1 ठार तर 3 जखमी

Pune PMC News | येवलेवाडीतील बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई; बेकायदा प्लॉटींग आणि बांधकामांना नोटीसा