Domestic LPG Gas Prices | 1 एप्रिलपासून पुन्हा वाढू शकतात LPG सिलेंडरचे दर, जाणून घ्या किती रुपयांची होऊ शकते वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Domestic LPG Gas Prices | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे एलपीजीच्या किमतीत वाढ न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जो दिलासा मिळत होता, तो दर वाढल्यामुळे 22 मार्च रोजी संपला आहे. आता 1 एप्रिललाही नवीन दर जारी करण्यात येणार असून यावेळीही एलपीजी सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder Price) दरात 50 ते 100 रुपयांची वाढ अपेक्षित आहे. (Domestic LPG Gas Prices)

 

सध्या दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत 949.5 रुपये आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर 2021 रोजी घरगुती एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. सरकार इंधन दरवाढीचे कारण रशिया – युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) असल्याचे सांगत आहे.

 

पेट्रोलच्या दरात अचानक वाढ
दुसरीकडे, गेल्या 8 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 वेळा वाढ झाली आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 115.88 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 100.10 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दराने शतकी मजल मारली आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 101 रुपये प्रति लिटर तर 1 लिटर डिझेलचा दर 92.27 रुपये झाला आहे. (Domestic LPG Gas Prices)

 

औषधे सुद्धा महागणार
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्वसामान्यांना औषधांवर जास्त खर्च करावा लागणार आहे. तापावरील प्राथमिक औषध पॅरासिटामॉलसह सुमारे 800 जीवनावश्यक औषधांच्या किमती 10.7 टक्क्यांनी वाढणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने या औषधांच्या घाऊक किंमत निर्देशांकात बदल करण्यास मान्यता दिली आहे.

अनेक वाहन कंपन्याही वाढवणार किमती
काही मोठ्या वाहन कंपन्यांनी सांगितले आहे की ते नवीन आर्थिक वर्षापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहेत. टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे म्हटले आहे.

तर लक्झरी कार ब्रँड मर्सिडीज – बेंझ इंडियाने वाहनांच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. तसेच, आणखी एका लक्झरी कार ब्रँड बीएमडब्ल्यूने किमतीत 3.5 टक्के वाढ जाहीर केली आहे.

 

टॅक्सच्या कक्षेत क्रिप्टोकरन्सी
क्रिप्टोकरन्सीसह सर्व डिजिटल (Digital Transactions In India) मालमत्तांवरही 1 एप्रिलपासून कर आकारला जाईल.
2022 – 23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्व आभासी डिजिटल मालमत्तेवर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली होती.
या अंतर्गत गुंतवणूकदाराला क्रिप्टोकरन्सी विकून झालेल्या नफ्यावर सरकारला कर द्यावा लागेल.

यासोबतच, जेव्हा क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार (Cryptocurrency Transaction) होतो, तेव्हा त्या व्यवहाराच्या मूल्याच्या 1 टक्के रक्कम टीडीएस म्हणून कापली जाईल.
हा व्यवहार नफ्याचा असो वा तोट्याचा, टीडीएस कापला जाईल. मात्र, हा नियम 1 जुलैपासून लागू होणार आहे.

 

Web Title :- Domestic LPG Gas Prices | domestic lpg prices may increase from april 1

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा