देशांतर्गत सुरक्षेला प्राधान्य, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत नरेंद्र मोदींनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य हे प्रमुख धोरण आहे. त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत देशातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केली. देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील तीन दिवसी बैठकीत मोदी यांनी मार्गदर्शन केले.

पुण्यातील पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’ (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) संस्थेच्या आवारात ही परिषद होत आहे. परिषदेला देशातील प्रत्येक राज्याचे पोलीस महासंचालक, गुप्तचर विभागाचे प्रमुख आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित आहेत. शुक्रवारी या परिषदेचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी अमित शहा यांनी परिषदेला मार्गदशन केले. शुक्रवारी रात्री पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात रात्री आगमन झाले. राजभवन येथे त्यांचा मुक्काम होता. त्यानंतर शनिवारी त्यांनी या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

मोदी यांनी तंत्रज्ञानातील बदल, त्याअनुंषगाने होणारा तपास, देशांतर्गत सुरक्षा तसेच दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया या विषयांवर मार्गदर्शन केले. सीमेपलीकडील शत्रू देशाअंतर्गत सुरक्षेला आव्हान देत आहेत. देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नसून आपल्या देशातील तपास यंत्रणा बाह्यआक्रमणे तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास सक्षम असल्याचे यावेळी मोदी यांनी नमूद केले.

तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जाणार आहे. परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्याकीय तपास आणि शास्त्रीय तपास असा आहे. दरम्यान,  शुक्रवारी या परिषदेचा प्रारंभ झाला. तीन दिवसांच्या परिषदेची सांगता रविवारी (9 डिसेंबर) होईल.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like