पुण्यात लॉकडाऊनमध्ये कौटुंबिक छळात पुरुषही ‘बाधित’, पोलिसांकडे आलेल्या 3 हजार तक्रारीपैकी निम्या तक्रारी या पुरुषांच्याच

पुणेः पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला. या दरम्यान अनेक कुटुंबात कौटुंबिक वाद (domestic voilence) होत असल्याचे समोर आले आहे. यातील अनेक वाद विकोपाला जाऊन थेट पोलीसापर्यंत पोहचले आहेत. विशेष म्हणजे पुरुषाचाही छळ होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गेल्या दीड वर्षात पुण्यात कौटुंबीक प्रकरण (domestic voilence) सोडवणाऱ्या पोलिसांच्या भरोसा कक्षाकडे जवळपास 3 हजारावर तक्रारी आल्या आहेत.

यात विशेष म्हणजे महिला आणि पुरुष दोघांच्या तक्रारींची संख्या जवळपास अर्धी-अर्धी आहे.

पत्नीकडून पतीला मारहाण, मानसिक आणि शारीरिक छळाचे प्रकार वाढत असल्याच्या या तक्रारी आहेत.

केवळ पुण्यात दीड वर्षांत अशा 1535 तक्रारी पुरुषांकडून पत्नीच्या विरोधात केलेल्या आहेत.

पुणे पोलिसांच्या भरोसा सेलकडे आलेल्या 3 हजार तक्रार अर्जांपैकी 2394 अर्ज निकाली काढले आहेत. यापैकी अनेक दाम्पत्यांमधील वाद सामोपचाराने मिटवले आहेत.

गेल्या वर्षी भरोसा कक्षाकडे 1283 पुरुषांनी कौटुंबिक कलहाच्या तक्रारी आल्या होत्या. तर महिलांकडून 791 अर्ज दाखल केले होते.

पोलिसांकडे कौटुंबीक कलहाची जवळपास 3 हजार प्रकरण दाखल आहेत.
यात पुरुषाएवढ्यात महिलांच्याही तक्रारी आहेत.

महिलांच्या तक्रारींची संख्या 1540 एवढी आहे. भरोसा कक्षाकडे येणा-या पुरुषांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

पत्नी नांदायला येत नाही किंवा किरकोळ वादातून पत्नी त्रास देत असल्याच्या तक्रार अर्जाचे प्रमाण अधिक आहे.

बऱ्याचदा दाम्पत्यातील वाद कुटुंबात सोडविले जात नाहीत.

पोलिसांकडे एखादा वाद आल्यास दाम्पत्यामधील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुजाता शानमे यांनी दिली आहे.

Also Read This : 

 

Police Sub Inspector Transfers | राज्यातील 19 पोलिस उपनिरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या
COVID-19 : कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे गंभीर संसर्गात बदलण्यापासून रोखण्यासाठी ‘या’ चुका टाळा, जाणून घ्या

 

Gold Man Datta Fuge Murder Case | ‘गोल्डमॅन’ दत्ता फुगे खून प्रकरणातील आणखी दोन मारेकर्‍यांना पोलिसांनी पकडलं, प्रचंड खळबळ

 

‘तल्लख’ बुद्धीसाठी सुरु करा ‘या’ ९ पदार्थांचे सेवन, जाणून घ्या