नशीबवान मुल ! …म्हणून डॉमिनोज पुढील 60 वर्षांपर्यंत देणार फ्री पिझ्झा

पोलिसनामा ऑनलाईन – पिझ्झासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या फास्ट फूड चेन डॉमिनोजला ऑस्ट्रेलियामध्ये ९ डिसेंबर रोजी ६० वर्ष पूर्ण होणार होती. त्यानिमित्त कंपनीने एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

९ डिसेंबरला जन्माला येणाऱ्या मुलाचं नाव Dominic असं ठेवल्यास त्यांना मोठं गिफ्ट दिलं जाईल अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. त्या स्पर्धेचे ‘चवदार गिफ्ट’ खरोखर भेटलंय ऑस्ट्रेलियाच्या एका दाम्पत्याला, या दाम्पत्याला डॉमिनोज पुढील ६० वर्षांपर्यंत दर महिन्याला मोफत पिझ्झा देणार आहे.विशेष म्हणजे या दाम्पत्याला याची कल्पनाही नव्हती. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये क्लीमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथनी लॉट जोडप्याला ९ डिसेंबर रोजी मुलगा झाला, त्यांनी मुलाचं नाव Dominic असं ठेवलं.

 

 

 

 

 

 

 

९ डिसेंबरला जन्माला येणाऱ्या मुलाचं नाव Dominic असं ठेवल्यास त्यांना मोठं गिफ्ट दिलं जाईल अशी घोषणा डॉमिनोज कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र या स्पर्धेबाबत क्लीमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथनी लॉट यांना काहीही कल्पना नव्हती. योगायोगाने ९ डिसेंबर रोजीच त्यांच्या घरी पाळणा हलला, आणि त्यांनी त्याचं नाव Dominic ठेवलं. बाळासाठी हे नाव त्यांनी आधीच ठरवलं होतं. नातेवाईकांना बाळाच्या नावाबाबत समजल्यावर त्यांनी दांम्पत्याला स्पर्धेबाबत सांगितलं आणि बाळाच्या जन्मानंतर काही तासांमध्येच त्यांना शानदार गिफ्ट मिळालं. डॉमिनोज कंपनीनेही आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली. प्रत्येक महिन्याला १४ डॉलरचा एक पिझ्झा पुढची ६० वर्ष या कुटुंबाला मोफत मिळणार आहे.