डॉन आबू सालेम २००२ च्या खंडणी प्रकरणात दोषी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने 2002 मध्ये दिल्ली खंडणी प्रकरणात गँगस्टर अबू सालेम याच्याविरुद्ध खटल्याची सुनावणी केली. या खटल्यात आबू सालेम ला दोषी ठरवण्यात आले आहे. जानेवारी 2016 मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये आबू सालेम विरोधात पुरेसे पुरावे नव्हते त्यामुळे या केस ची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.

त्याच्या वकीलमार्फत आबू सालेमने असा दावाही केला होता की, या प्रकरणाची सुनावणी 2005 मध्ये पोर्तुगल येथून भारतात आणण्यात यावी. त्यानुसार सुनावणी भारतात आणण्यात आली होती. २००२ मध्ये दिल्ली येथील उद्योगपती अशोक गुप्ता यांच्याकडून 50 दशलक्ष रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याबद्दल सालेमचा खटला सुरू होता.

दरम्यान, आबू सालेम ला आधीपासूनच एका प्रकरणात जामीन मंजूर झाला असला तरीही 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणासह इतर अनेक प्रकरणांमध्ये दोषी असल्यामुळे तो तुरुंगातच आहे.