मला ‘ हिंदूहृदयसम्राट’ म्हणू नका : राज ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रंगशारदेवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सीएए कायद्याच्या समर्थनात 9 फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाच्या बांधणीसाठी ही बैठक घेण्यात आली. यावेळी राज ठाकरे काहीच वेळ बैठकीत सहभागी झाले. परंतू यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना देताना सांगितले की, मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका.

राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, आंदोलनावेळी राजमुद्रेच्या झेंड्याचा अवमान करु नका, ना भूतो ना भविष्यती असा मोठा मोर्चा काढा. यावेळी मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका असेही राज ठाकरे म्हणाले.

या बैठकीनंतर राज ठाकरे काही मिनिटात रंगशारदामधून बाहेर पडले. तब्येत बरी नसल्याने ते लवकर गेल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बाळा नांदगावकर म्हणाले की, पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मोर्चाची माहिती सर्वांना देऊ. तसेच राज ठाकरेंनी आपल्याला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका अशी विनंती केली.

बाळासाहेब ठाकरेच हिंदूहृदयसम्राट होते ही त्यांच्या मनात भावना असेल म्हणून त्यांनी सांगितलं की मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका आणि तसे बॅनर देखील कोणी लावू नका अशा सूचना देखील राज ठाकरेंनी दिल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.