डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार केले, मॉडेल अ‍ॅमी डोरिसचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा खळबळजनक आरोप अ‍ॅमी डोरिसने केला आहे. ट्रम्प यांनी 20 वर्षांपूर्वी माझे लैंगिक शोषण केल्याचा आरोप मॉडेलने केला आहे. 1997 मध्ये ओपन टेनिस स्पर्धा होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या व्हिआयपी बॉक्समधील बाथरुममध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप अ‍ॅमी डोरिसने केला आहे.

अ‍ॅमी डोरिसने म्हटले की, त्यावेळी मी 24 वर्षांची होती. ट्रम्प यांनी माझा लैंगिक छळ केला. मी तिथून सुटून, पळूनही जाऊ शकत नव्हते. मी ट्रम्पना मागे ढकलत प्रतिकारही करत होते. मात्र तरीही त्यांनी माझा लैंगिक छळ केला. हा अनुभव माझ्यासाठी भयंकर होता. या घटनेनंतर माझ्या मनात अत्यंत विचित्र भावना येत होत्या. खूपच वाईट वाटत होते असेही अ‍ॅमी डोरिसने सांगितले आहे. अ‍ॅमी डोरिस सध्या फ्लोरिडात वास्तव्य करते. 2016 मध्येच या गोष्टींना वाचा फोडायची असे ठरवले होते. मात्र कदाचित आपण बोललो तर कुटुंबाला त्याचा त्रास होऊ शकतो असे तिला वाटल्याने तेव्हा ती शांत राहिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like