डोनाल्ड ट्रम्प सरकारने H-1B वीजामध्ये केली सवलतीची घोषणा, काही अटींसह अमेरिकेत परतण्याची परवानगी

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प सरकारने एच-1बी वीजाचे काही नियम शिथिल करण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प सरकारच्या या निर्णयाने काही अटींसह एच-1बी वीजा धारकांना अमेरिकेत परतण्याची परवानगी मिळेल. यामुळे त्या लोकांना फायदा मिळेल, जे वीजावरील प्रतिबंधामुळे नोकरी सोडून गेले होते. यासाठी जर ते पुन्हा त्याच नोकरीवर परतत असतील, तर त्यांना फायदा मिळेल. अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागाराने म्हटले की, यामध्ये प्रायमरी वीजाधारकाची पत्नी आणि मुले यांना सुद्धा प्रवासाची परवानगी दिली जाईल.

पहिल्या नोकरीतच परतावे लागेल
अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या सल्लागारांनुसार जे अर्जदार अमेरिकेत आपल्या पहिल्या नोकरीसाठी अर्ज करतील तर त्यांना वीजा काही अटींवर मिळू शकतो.

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने तंत्रज्ञान तज्ज्ञ, वरिष्ठ-स्तरीय व्यवस्थापक आणि अन्य कर्मचार्‍यांना प्रवासाची परवानगी दिली आहे, ज्यांकडे एच-1बी वीजा आहे. एवढेच नव्हे, त्यांचा प्रवास अमेरिकेत ताबडतोब आणि निरंतर आर्थिक सुधारणांसाठी सुविधाजनक बनवण्यासाठी खुप जरूरी आहे, असेही सल्लागाराने म्हटले आहे.

23 जूनला लावला होता प्रतिबंध
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने 23 जूनला या महत्वाच्या निवडणूक वर्षात अमेरिकन कर्मचार्‍यांच्या संरक्षणासाठी एच-1बी वीजा आणि अन्य प्रकारचे परदेशी कार्य वीजांवर 2020 च्या अखेरपर्यंत स्थगिती आणली होती. एच-1बी वीजा भारतीय आयटी नोकरदारांमध्ये खुप लोकप्रिय आहे.

एच-1बी एक अनिवासी वीजा आहे. याद्वारे अमेरिकन कंपन्या तंत्रज्ञ किंवा अन्य तज्ज्ञ पदांसाठी परदेशी कर्मचार्‍यांची नियुक्ती करू शकतात. अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या दरवर्षी या वीजाच्या आधारावर चीन आणि भारतातून हजारो कर्मचार्‍यांना नियुक्त करतात. अमेरिकेत एच-1बी प्रत्येक आर्थिक वर्षात वार्षिक मर्यादा 65,000 ची आहे.