अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘WWF’मध्ये आयोजकाची धुलाई करतात तेव्हा (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येत्या 2020 साली अमेरिकेत सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे अमेरिकेत जोरदार सोशल मिडिया कॅम्पेनला सुरुवात झाली आहे. हाउडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी देखील अबकी बार ट्रम्प सरकारचा नारा दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार यंत्राना जोमाने कामाला लागली आहे. सध्या त्याचाच एक भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी WWE च्या नामांकित फ्री स्टाइल कुस्तीचे आयोजन विन्स मॅकमॅहॉन याला मारहाण करताना दिसून आले, त्यात त्यांनी त्यांचे टक्कल देखील केले.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

https://www.facebook.com/watch/?v=1409181085799179

हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याला पाश्वभूमी अशी की त्यातून संदेश देण्यात येत आहे की ट्रम्प यांच्या विरोधात कोणीही उभे राहिले तरी त्यांची अवस्था राष्ट्राधक्ष अशीच करतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ ते राष्ट्राध्यक्ष होण्याआधीचा आहे.

2007 मध्ये WWE WrestleMania 23 मध्ये वर्ल्ड रेसलिंग एन्टरटेन्मेटचे आयोजक विन्स मॅकमॅहॉन याला मारहाण करत ट्रम्प यांनी त्यांचे टक्कल केले होते. Battle of the Billionaires या मॅचमध्ये विन्स मॅकमॅहॉन याने रेसलर उमागावर बोली लावली होती. त्या विरोधात खेळण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी बॉबी लॅशलीला निवडले होते.

या सामन्यात बऱ्याच चिटींगही झाल्या होत्या. सामन्याचे रेफरी असलेले विन्स मॅकमॅहॉन याचा मुलगा हा शेन होता. शेनने चिटींग केल्यानंतर त्याच्याऐवजी स्टोन कोल्ड स्टीव ऑस्टिन यांना रेफरी करण्यात आले. त्यानंतर डोनाल्ड ट्रंप यांनी निवड केलेल्या बॉबी लॅशली याने मॅच जिंकली. पण तेवढ्यात ट्रम्प यांनी एन्ट्री केली. ट्रम्प यांनी विन्स मॅकमॅहॉन याला मारहाण करत रिंगमध्ये गेले आणि त्यांचे टक्कल केले. या मॅचला आता 12 वर्ष पूर्ण झाले, हा तेव्हाचा व्हिडिओ आता निवडणूकीनिमित्त सोशल मिडियावर शेअर करण्यात येत आहे.