अमेरिका : व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेस कॉन्फरंस दरम्यान व्हाईट हाऊसच्या बाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. या घटनेला स्वत: ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले की, या घटनेत कुणाला तरी गोळीसुद्धा लागली आहे आणि त्यास हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना सीक्रेट सर्व्हिसच्या कर्मचार्‍यांनी सुरक्षित ठिकाणी नेले.

ट्रम्प यांनी प्रेस कॉन्फरंसदरम्यान म्हटले की, व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबार होत होता, आणि वाटते सर्वकाही नियंत्रित करण्यात आले आहे. मी सीक्रेट सर्व्हिसच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या तात्काळ आणि खुप प्रभावी कारवाईसाठी धन्यवाद देतो. कुणाला तरी हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आहे. वाटते की त्या व्यक्तीला सीके्रट सर्व्हिसद्वारे गोळी मारण्यात आली आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार सीक्रेट सर्व्हिस एजन्टने राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना प्रेस कॉन्फरंसच्या सुरूवातीनंतर ताबडतोब व्हाइट हाऊसच्या ब्रीफिंग रूमच्या बाहेर काढले. प्रेस कॉन्फरंसमध्ये परल्यानंतर राष्ट्रपती ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, व्हाइट हाऊसच्या बाहेर गोळीबार सुरू होता.

प्रेस कॉन्फरंसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसबाबत चर्चा केली. ते म्हणाले, आम्ही आतापर्यंत सुमारे 65 मिलियन लोकांची कोरोना टेस्ट केली आहे. कोणताही देश या संख्येच्या जवळसुद्धा नाही. 1.5 बिलियनची लोकसंख्या असणारा भारत सुद्धा जवळपास 11 मिलियन टेस्ट केल्यानंतर दुसर्‍या नंबरवर असू शकतो. मला विश्वास आहे की, वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याकडे या महामारीची लस उपलब्ध असेल.

यासोबतच ट्रम्प यांनी चीनवर हल्ला करत म्हटले की, चीनने जे काही केले त्यामुळे आपण त्रस्त आहोत. चीन चांगला नाही. जर आम्ही निवणूक जिंकली तर इराण एक महिन्यात आपल्याशी सौदा करेल. पण ईमानदारीने बोलायचे तर मला वाटत नाही की आपण चीन सोबत सौदा करण्यास इच्छूक आहोत.