पंतप्रधान नरेंद्र मोदी महान आणि खुपच चांगले नेते : डोनाल्ड ट्रम्प

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनामुळे हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल भारताला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला होता. मात्र, आज ट्रम्प यांच्या भूमिकेत अचानक बदल झाला आहे. त्यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधासंबंधी नरेंद्र मोदी सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तसेच कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांचेही कौतुक केले आहे.

कोरोना व्हायरसवर उपचारासाठी मी लाखो डोस खरेदी केले आहेत. दोन कोटी 90 लाखापेक्षा जास्त डोस खरेदी केले आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. भारतातून भरपूर औषधे येणार आहेत. तुम्ही निर्बंध हटवू शकता का? असे मी मोदींना विचारले. ते महान आहेत. ते खूपच चांगले आहेत. भारतासाठी औषधांची आवश्यकता असल्याने त्यांनी हे निर्बंध घातले होते असे ट्रम्प म्हणाले. हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधावरुन डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली होती. पण भारत सरकारने त्याआधीच औषध विक्रीच्या धोरणामध्ये बदल झाल्याचे अमेरिकेला कळवले होते.

भारताने हे दिले उत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधावरुन जशास तसे उत्तर देण्याची भाषा केल्यानंतर भारतानेही सुनावले होते. भारत आपल्या शेजारी देशांना व कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल. त्यामुळे यावरुन कुठलेही अंदाज बाधू नका तसेच राजकारणही करु नका असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like