COVID-19 : डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘कोरोना’ टेस्टचा रिपोर्ट आला, डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना व्हायरसचा टेस्ट रिपोर्ट आला आहे. एका वृत्तसंस्थेने व्हाईट हाऊसच्या डॉक्टरांचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, ट्रम्प यांची कोरोना टेस्ट निगेटीव्ह आला आहे. म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोना व्हायरसने पीडित नाहीत. ट्रम्प यांनी अमेरिकन वेळेनुसार शुक्रवारी कोरोना व्हायरसची टेस्ट केली होती. ट्रम्प यांच्या कोरोना व्हायरसचा टेस्ट रिपोर्ट 24 तासांच्या आत आला.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे नाहीत
ट्रम्प यांच्या टेस्ट रिपोर्टची माहिती देताना राष्ट्राध्यक्षांचे डॉक्टर सीन कोनली आणि व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी स्टॅफनी ग्रीसम यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत कोविड-19 टेस्टबाबत दीर्घ चर्चा झाली होती, यानंतर त्यांनी टेस्टची प्रक्रिया करण्यास सांगितले. ही टेस्ट निगेटिव्ह आली आहे. डॉ. सीन कोनली यांनी म्हटले की, ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिनिधी मंडळासोबत डिनरच्या एक आठवड्यानंतर सुद्धा राष्ट्राध्यक्षांमध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

जगभरात 5764 मृत्यू

जगभरात कोरोना व्हायरसमुळे पीडित लोकांची संख्या 1 लाख 51 हजार 760 झाली आहे. हा भयंकर व्हायरस आतापर्यंत 137 देशांत पसरला आहे. यामुळे 5764 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये या आजाराने 3189 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर चीनच्या बाहेर कोरोनामुळे मरणार्‍यांची संख्या 2575 आहे.

चीननंतर सर्वात प्रभावित देश इटली आहे, जेथे 1441 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 21 हजार 157 लोक यामुळे पीडित आहेत. इराणमध्ये या आजारामुळे मरणार्‍यांची संख्या 611 आहे.