जाता जाता ताजमहाल दाखवणाऱ्या गाईडला ट्रम्प यांनी दिलं खास ‘गिफ्ट’, नितीनसिंग बनला सेलिब्रिटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. अहमदाबादमध्ये लोकांना भेटल्यानंतर ट्रम्प आग्रा येथे गेले. ट्रम्प यांनी आग्रामधील एका व्यक्तीला भेटवस्तू दिली. ही भेट खूप खास होती. या भेटवस्तूवर डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आणि व्हाईट हाऊसचा लोगो मुद्रित केला होता. आग्र्यातील ताजमहल पाहत असताना ट्रम्प यांनी एका व्यक्तीला ७ प्रश्न विचारले होते आणि या व्यक्तीने या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली. म्हणून ट्रम्प यांनी खुश होऊन या व्यक्तीला खास भेटवस्तू दिली. सोमवारी ट्रम्प आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी गेले होते. ताजमहाल पाहताना ट्रम्प यांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले होते.

मग ट्रम्प यांनी त्यांचे आग्र्यातील गाईड नितीन सिंह यांना हे सर्व प्रश्न विचारले. ट्रम्प यांनी विचारलेल्या सात प्रश्नांना नितीन यांनी योग्य उत्तरे दिली. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी नितीन सिंग यांना एक खास भेट दिली.

काय होते ट्रम्प यांनी विचारलेले ७ प्रश्न

ताजमहाल पाहताना डोनाल्ड ट्रम्प यांनी नितीन सिंग यांना सात प्रश्न विचारले

१) ताजमहाल कोणी बांधला ?
२) ज्या कलाकारांनी तो बनवला ते कोठून आले ?
३) शाहजहांला कोठे तुरुंगवास भोगावा लागला ?
४)  ताजमधील संगमरवर कोठून आले ?
५) आतापर्यंत ताजमहालमध्ये काय बदलले गेले आहेत ?
६) या शाहजहांच्या काळातील जलवाहिन्या आहेत की नंतर बांधण्यात आल्यात ?
७) तळघरामध्ये मध्ये थडगे आधी की नंतर बांधले गेले ?

ट्रम्प यांनी विचारलेल्या या सात प्रश्नांची उत्तरे नितीनसिंग यांनी मोठ्या संयमाने व सभ्यतेने दिली. त्या बदल्यात आनंदी राहून डोनाल्ड ट्रम्प यांनी नितीन सिंग यांना स्मृतिचिन्ह दिले.

ट्रम्प यांनी नितीन यांना विचारले की ताजमहालवरील हे चित्र काय आहे? नितीनने उत्तर दिले की ही पेंटिंग नाही तर त्याला पच्चीकारी म्हणतात. याचा अर्थ, हा एक असा संगमरवर आहे ज्यावर मौल्यवान घटक जडलेले आहेत. ट्रम्प यांनी विचारले की ताजमहालच्या तळघर आणि वर बांधलेल्या थडग्यांमधील मूळ थडग्यांची काय कथा आहे? तेव्हा नितीन यांनी त्याला उत्तर दिले की इस्लाम धर्मात कबरी सजावटीला परवानगी नाही. या कारणास्तव, शाहजहांने वरील वेगवेगळ्या शोभेच्या थडग्यांची प्रतिकृती तयार केली होती. नितीनसिंग यांनी ट्रम्प यांना सांगितले की ताजमहालमधील पाण्याचे जलवाहिनी सायफोन प्रणालीद्वारे चालते आणि ताजमहालच्या काळापासून पाण्याचे सायफोन यंत्रणा कार्यरत आहे. जगभरातून कारागिरांना ताजमहाल बांधण्यासाठी बोलावले होते.

नितीनसिंग यांनी ट्रम्प यांना माहिती दिली की ताजमहाल तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला संगमरवरी मकराना आणि काळा पाषाण दक्षिण भारतातून आणले गेले.ट्रम्प यांनी ताजमहालमध्ये बांधले गेलेले दुहेरी घुमट, त्यामधील ध्वनी, शाही मशिदी आणि मेहमानखाना याविषयीही माहिती घेतली.नितीनसिंग यांनी ताजमहालच्या निर्मितीची संपूर्ण कहाणी ट्रम्प यांना सांगितली. याशिवाय नितीन यांनी ट्रम्प यांना शाहजहां आणि मुमताज महल यांच्या असलेल्या प्रेमाच्या कहाण्याही सांगितल्या.