उत्तर अमेरिकेनंतर भारतामध्ये राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा व्यावसाय, जाणून घ्या किती लाख कोटींची आहे ‘संपत्ती’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली पत्नी आणि मुलीसह भारतात आले आहेत. ट्रम्प दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात येत आहेत. दरम्यान, ट्रम्प हे एक प्रसिद्ध राजकारणीसोबतच मोठे उद्योगपती देखील आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राबरोबर इतर व्यवसायातही ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक आहे. महत्वाचे म्हणजे ट्रम्प यांनी उत्तर अमेरिकेनंतर रिअल इस्टेटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली ती भारतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या भारत भेटीला दोन देशांच्या राजकारणासोबतच त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांनादेखील महत्त्व आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे साम्राज्य
द ट्रम्प ऑर्गनायझेशन हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या 500 व्यवसायिक घटकांचा समूह आहे. यापैकी 250 हून अधिक कंपन्या ट्रम्प नावाचा वापर करतात. याची स्थापना ट्रम्पची आजी एलिझाबेथ ख्रिस्त ट्रम्प आणि वडील फ्रेड ट्रम्प यांनी ई ट्रम्प अँड सन्स म्हणून केली होती. कंपनीचे वार्षिक उत्पन्न वर्षाकाठी सुमारे 5000 कोटी रुपये आहे.

ट्रम्प यांचे भारतात रिअल इस्टेट प्रोजेक्ट :
ट्रम्प ऑर्गनाइजेशनने 2013 मध्ये भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रवेश केला आणि भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने 5 लक्झरी निवासी प्रकल्प सुरू केले. ट्रम्पच्या कंपनीत लोढा ग्रुप, पंचशील रियल्टी, एम 3 एम, ट्रीबेका, युनिमार्क आणि इरिओ या भारतीय कंपन्या कार्यरत आहेत. ट्रम्प ऑर्गनायझेशन ऑफ इंडियामध्ये काम करणाऱ्या कंपन्या म्हणतात की, ट्रम्प यांच्या ब्रँडच्या नावावर ते केवळ 40टक्के अतिरिक्त किंमत वसूल करण्यास सक्षम आहेत आणि हा ब्रँड भारतात चांगली कामगिरी करत आहे.

ट्रम्प टॉवर्स, पुणे
इंडिया पार्टनर – पंचशील रियल्टी
स्थान – कल्याणी नगर
मजला- 23 मजल्यांचे 2 टॉवर्स
एकूण अपार्टमेंटस् – एकल मजल्यासह 46 अपार्टमेंट
लाँच – 2012 , पूर्ण – 2019
किंमत – 15 कोटींपेक्षा जास्त
खास – 13,500 चौरस फूट आर्ट गॅलरी आणि बाहेरची पूल

ट्रम्प टॉवर, मुंबई
इंडिया पार्टनर – लोढा ग्रुप
ठिकाण- गोल्डन माईल, वरळी
मजला – 75 मजली
एकूण अपार्टमेंट्स – 300
लाँच – 2013, पूर्ण – 2019
किंमत- 9 कोटींपासून सुरु
यूएसपी – खासगी जेट सेवा, ट्रम्प कार्ड

ट्रम्प टॉवर, कोलकाता
इंडिया पार्टनर – युनिमार्क ग्रुप, आरडीबी ग्रुप आणि ट्रायबिका डेव्हलपर
स्थान – ईस्टर्न मेट्रोपॉलिटन बायपास स्ट्रेच
मजला – 39 मजले
एकूण अपार्टमेंट्स – 140
लाँच – ऑक्टोबर 2017, पूर्ण – 2020
किंमत- 3.75 कोटी पासून सुरू
यूएसपी – हीटेड पूल, सन टेरेससह रूफटॉप स्काय क्लब

ट्रम्प टॉवर गुरुग्राम (ट्राइबिका ट्रम्प टावर्स, गुडगाव)
इंडिया पार्टनर – एम 3 एम इंडिया आणि ट्राइबिका डेव्हलपर
स्थान – सेक्टर 65
मजला- 50 मजल्यांचे 2 टॉवर्स
एकूण अपार्टमेंट्स – 258
लाँच – जानेवारी 2018, पूर्ण – मार्च 2023
किंमत- 5.5 कोटी रुपयांपासून सुरू
यूएसपी – खासगी लिफ्ट, 22 फूट उंच डबल उंचीचे लिव्हिंग रूम

आइरियो ट्रम्प टॉवर गुरुग्राम
इंडिया पार्टनर – इरिओ
स्थान – गोल्फ कोर्स विस्तार रोड