Coronavirus : ‘कोरोना’मुळं 90 हजार जणांच्या मृत्यूनंतर ट्रम्प म्हणाले – अधिक पॉझिटिव्ह रूग्ण ‘गर्वाची गोष्ट’

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अमेरिकेत कोरोना विषाणूची एकूण 1,528,566 प्रकरणे समोर आली आहेत. कोरोनामुळे देशात 91,921 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात संक्रमित झालेल्या लोकांच्या संख्येला अभिमान असल्याचे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रम्प म्हणाले की, जगात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह अमेरिकेतील ‘बॅज ऑफ ऑनर’ आहेत. ते म्हणाले की, मी काही प्रमाणात असे पाहतो की, ही चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आमची चाचणी खूप चांगली आहे.

व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘जेव्हा तुम्ही असे म्हणता की, आम्ही कोरोनाच्या बाबतीत जगात आघाडीवर आहोत तेव्हा याचा अर्थ असा होतो की, आमच्याकडे इतरांपेक्षा अधिक चाचणी सुविधा आहेत.’ कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठकही घेतली आहे.

यापूर्वी कोरोनाबाबत अनेक वादग्रस्त विधाने करणारे ट्रम्प म्हणाले की, ‘सध्या आमच्याकडे जास्त प्रकरणे आहे. मी याकडे वाईट गोष्ट म्हणून पाहत नाही. आमची चाचणी खूप चांगली आहे असे मी काही प्रमाणात समजतो.’ अमेरिकन राष्ट्रपतींनी असेही म्हटले आहे की, बर्‍याच प्रोफेशनल लोकांनी जे काम केले आहे आणि चाचणी केली आहे ही एक मोठी श्रद्धांजली आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार, मंगळवारपर्यंत अमेरिकेने एक कोटी 26 लाख कोरोना चाचण्या केल्या आहेत.

एकूण चाचणीबद्दल बोलायचे म्हणले तर, अमेरिकेने जगात नक्कीच सर्वात जास्त चाचणी केली आहे. परंतु ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या Our World in Data नुसार ‘कॅपिटा बेसिस’ वर हे जगातील पहिल्या क्रमांकावर नाही. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या Our World in Data मध्ये प्रति हजार लोकांनी केलेल्या चाचण्यांमध्ये अमेरिका 16 व्या क्रमांकावर आहे. आइसलँड, न्यूझीलंड, कॅनडा प्रति हजार लोकांच्या एकूण चाचणीच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा पुढे आहेत.