काय सांगता ! होय, 3 मुलांची आई असलेल्या इवांका ट्रम्पला ‘मॉडलिंग’, ‘रियालिटी शो’, ‘TV सीरिज’, ‘बिझनेस’मध्ये खुपच ‘रस’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पहिल्या भारतीय दौर्‍यावर आले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यावर सोबत आलेली त्यांची मुलगी इवांका ट्रम्प चर्चेत राहिली आहे. मग वर्षभर आधीचा जुना ड्रेस घालून भारतात येणे असो, वा दोन वर्षांपूर्वी केलेली भारत यात्रा असो, सर्व काही चर्चेचा विषय बनले आहे. बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलेली इवांका प्रतिभावान आहे. तिने मॉडेलिंग, टीव्ही इंडस्ट्री, समाज सेवा आणि अगदी व्यवसायातही आपला ठसा उमटवला आहे.

View this post on Instagram

Friday Morning Mood ☕️ #FBF

A post shared by Ivanka Trump (@ivankatrump) on

माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे नाव बालपणात इवांका नव्हते. तिला बालपणात इवाना असे नाव देण्यात आले, जे तिच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आले होते. नंतर तिचे नाव इवांका ट्रम्प ठेवण्यात आले. इवांका डोनाल्ड ट्रम्पची आणि त्यांची पहिली पत्नी इवानाची मुलगी आहे. इवांकाचा जन्म 30 ऑक्टोबर 1981 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता.

मॉडेलिंग ते टीव्ही आणि नंतर व्यवसाय
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीचे प्रारंभिक शिक्षण मॅनहटनच्या चॅपिन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी एका बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. येथूनच इवांकाने मॉडेलिंग सुरू केले. यानंतर, इवाकांने काही रियॅलिटी शो जज केले आणि काही टीव्ही ड्रम सिरीजमध्येही दिसली. यानंतर तिने व्यवसायासाठी आपले लक्ष आजमावले आणि बिझिनेस वुमन म्हणून आपली ओळख निर्माण केली. इवांकाने व्हार्टन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली आहे.


इवांकाला बदलावा लागला तिचा धर्म

इवाकां ट्रम्पला जेरेड कुशनरशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलावा लागला होता. इवांकाच्या या निर्णयाशी ट्रम्प सहमत नव्हते. त्यांनी म्हटलेही होते की, लग्नासाठी माझ्या मुलीने आपला धर्म बदलण्याची काय गरज आहे. इवांकाचा पती जेरेड कुशनर यहूदी आहे. 2009 मध्ये दोघांचे लग्न झाले होते. इवांका तीन मुलांची आई आहे.

यापूर्वीही भारत भेट :
इवांका 2017 मध्ये हैदराबाद येथे ग्लोबल एंटरप्रिनरशीप समिटमध्ये भाग घेण्यासाठी भारत दौर्‍यावर आली होती. इवांकाने आपल्या आताच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्विटरवर जुन्या आठवणी शेअर केल्या होत्या. तीने आपल्या ट्विटमध्ये काही फोटोंसह लिहिले की, ‘हैदराबाद समिट येथे पीएम मोदींच्या भेटीनंतर दोन वर्षानंतर पुन्हा भारतात जात आहे. दुसऱ्यांदा भारतात येणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’

अमेरिकेत स्वतःहून उभे केले बिझनेस एम्पायर :
इव्हांका 2005 मध्ये कौटुंबिक व्यवसायात सामील झाली, जिथे ती ट्रम्प ऑर्गेनाइजेशनमध्ये डेव्हलपमेंट आणि संपादनाची कार्यकारी उपाध्यक्ष होती. त्यानंतर 2007 मध्ये तिने डायनामिक डायमंड कॉर्पोरेशनबरोबर भागीदारी केली. डिसेंबर 2012 मध्ये इवांकाला 100 Women in Hedge Fundsने आपल्या मंडळात निवडले.

You might also like