इवांका ट्रम्प : ‘मॉडेलिंग’ आणि ‘लाइफस्टाइल’ ब्रँड सोबतच ‘बेस्ट सेलिंग’ पुस्तकांची ‘लेखिका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटूंबासह भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती ट्रम्प यांची मुलगी इवांकाची. इवांका याआधी देखील भारतात येऊन गेली आहे आणि तेव्हा देखील तिची बरीच चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प प्रमाणे इवांका देखील तेवढीच लोकप्रिय आहे. मग भले की ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची मुलगी असेल परंतु तिची ओळख बिजनेस वुमन म्हणून आहे.

 

 

काय करते इवांका –
इवांकाच्या आईचे नाव इवाना आहे, त्यामुळे तिचे नाव देखील इवाना ठेवण्यात आले होते जे नंतर इवांका करण्यात आले. इवांका पहिल्यांदा मॉडेलिंग क्षेत्रात करिअर बनू इच्छित होती परंतु त्यानंतर ती आता एक सक्सेसफुल बिजनेसपर्सन झाली. इवांका बिजनेस संभाळण्याबरोबर तिच्या वडीलांच्या टीमचा देखील भाग आहे, जे ट्रम्प यांच्यासाठी काम करतात.

व्हाइट हाऊसच्या अधिकृत वेबसाइटनुसार इवांका ट्रम्प अधिकृतपणे डोनाल्ड ट्रम्प यांची सल्लागार म्हणून व्हाइट हाऊसमध्ये काम करते. ती सध्या अमेरिकेत शिक्षण, महिलांचे आर्थिक सशक्तिकरण आणि त्यांच्या कुटूंबाला नोकरी तसेच आर्थिक विकास या मुद्यांवर काम करत आहे. इवांकाने आपला भाऊ डोनाल्ड ज्युनिअर आणि एरिक यांच्या व्यवसायात सहकार्य केले होते.

 

इवांका एक लाइफस्टाइल ब्रांड देखील चालवतात. तसेच बिजनेसमध्ये सहभागी होण्यापूर्वी ती मॉडेलिंग देखील करत होती. तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात देखील चांगले काम केले आणि अनेक जाहिरातांमध्ये देखील ती दिसली. इवांका दोन न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नल बेस्ट सेलिंग पुस्तकाची लेखिका आहे. इवांकाने 2004 मध्ये पेंसिल्वेनिया विद्यापीठातून व्हार्टन स्कूल ऑफ बिजनेसमध्ये पदवी घेतली आहे.

 

इवांकाला फॉर्च्यून पत्रिकाच्या प्रतिष्ठित 40 अंडर 40 यादीत (2014) समाविष्ठ केले गेले होते आणि विश्व आर्थिक मंच (2015) द्वारे युवा जागतिक नेते या रुपात सन्मानित केले गेले होते. नुकतेच इवांकाला टाइमच्या 100 सर्वात प्रभावशाली यादीत (2017) आणि फोर्ब्सच्या टॉप 100 पॉवरफुल वुमन ऑफ द वर्ल्डच्या यादीत (2017) स्थान मिळाले होते. इवांका आणि त्यांचे पती जारेड कुशनर वॉशिंग्टन डीसी मध्ये राहतात आणि त्यांना तीन लहान मुलं आहेत, ज्यांची नावे अरबेला, जोसेफ आणि थियोडोर अशी आहेत.