तब्बल 1 लाख जनतेसमोर ‘चूक’ करून बसले डोनाल्ड ट्रम्प, लोक सोशल मीडियावर घेतायत ‘मज्जा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 लाख पेक्षा जास्त लोकांना मोटेरा स्टेडियममधून संबोधित केले परंतु ते भारतीय शब्दांचे उच्चारण यथावत करु शकले नाहीत. ट्रम्प यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचे नाव अनोख्या पद्धतीनेच घेतले. परिणाम हा झाला की सोशल मीडियावर त्यांना जबरदस्त ट्रोल करण्यात आले.

या भाषणादरम्यानच्या चूकांकडे लोकांनी चांगलेच घेरले. ट्रम्प यांनी भाषणादरम्यान माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याच्या नावाचा चुकीचा उच्चार केला. ट्रम्प म्हणाले की आपण जगातील सर्वात महान क्रिकेट खेळाडूंचा सन्मान करतो. ते आहेत सूचिन तेंडुलकर्र आणि विराट खोली.

यानंतर दोघांचे चाहते ट्रम्प यांना सोशल मीडियावर ट्रोल करायला लागले. एका वृत्तानुसार तेंडुलकरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 30 हजार पेक्षा जास्त धावा केल्या परंतु ट्रम्प यांनी ज्याप्रकारे त्याचे नाव घेतले त्यानुसार त्यांना क्रिकेटमध्ये कोणतीही रुची नाही हे स्पष्ट होते.

एका वृत्तानुसार ट्रम्प यांनी आपले भाषण तरी चांगले करायला हवे होते. कारण सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. ट्रम्प यांना आपल्या भाषणादरम्यान अनेक शब्दाचे चूकीचे उच्चारण केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या शब्दांचे चूकीचे उच्चारण केले –
चायवाला या शब्दाचे उच्चारण केले छीवाला,
शोलेचे उच्चारण शोजे,
वेंदो या शब्दांचे उच्चारण वेस्टा,
स्वामी विवेकानंद यांचे उच्चारण स्वामी विवेकामनन असे केले.

तर अनेकांनी ट्रम्प यांनी केलेल्या भारतीय शब्दांच्या उच्चारांचे कौतूक केले.