‘ही’ महिला कोण… ‘मोदी-ट्रम्प-मेलानिया’ यांच्यासोबत रेड कार्पेटवर दिसली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात ताकदवान देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी त्यांना अलिंगन देत विमानतळावर त्यांचे स्वागत केले. या दरम्यान मेलानिया ट्रम्प देखील त्यांच्यासोबत होत्या. या दरम्यान एका महिलेची चर्चा सुरु झाली जी पीएम मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत दिसली.

या महिलेचे नाव गुरदीप कौर चावला आहे. त्या पीएम मोदींसाठी अनुवादक (इंटरप्रिटर) म्हणून काम करतात. गुरदीप कौर सध्या अमेरिकन ट्रान्सलेटर असोसिएशनच्या सदस्या आहेत. परदेश दौऱ्यादरम्यान पीएम मोदी हिंदीत भाषण करतात आणि गुरदीप कौर त्याचा इंग्रजीत अनुवाद करतात. एवढेच नाही तर गुरदीप कौर भारतात देखील विदेशी नेते दौऱ्यावर असताना पीएम मोदींसोबत दिसल्या आहेत.

पीएम मोदी जेव्हा हिंदीत भाषण करतात तेव्हा ते जगभरातील नेत्यांना समजावे म्हणून त्याचा अनुवाद इंग्रजीत करण्याचे काम गुरदीप चावला करतात. त्यांनी 1990 पासून भारतीय संसदेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु त्यानंतर काही काळ त्या आपल्या पतीसह अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. 2010 मध्ये अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतीसह त्या त्यांच्या इंटरप्रिटर बनून भारत दौऱ्यावर आल्या होत्या.

गुरदीप 2014 साली मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये आयोजित मोदींच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि अनुवादाचे काम केले होते. तेथूनच त्या मोदींसह वॉशिंग्टन डीसीला गेल्या होत्या. जेथे मोदी आणि ओबामा त्यांच्यादरम्यान इंटरप्रिटरचे काम केले होते.

सर्व भाषेचे आहे ज्ञान –
गुरदीप कौर यांना सर्व भाषांचे ज्ञान आहे आणि याचमुळे त्या एक उत्तम अनुवादक (ट्रान्सलेटर) आहेत. याच कारणाने पीएम मोदी कोणत्याही दौऱ्यावर असतील, ते तेथील लोकांना त्यांच्या स्थानिक लोकांशी कनेक्ट करतात. त्या कायमच पीएम मोदींसह परदेश दौऱ्यावर दिसल्या आहेत.