डोनाल्ड ट्रम्प यांचं सुरक्षा कवच ! 200 CIA ‘एजंट-स्नायपर्स’ला घेऊन् पोहचलं ‘हरक्यूलिस’ विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प अहमदाबादमध्ये पोहचण्यापूर्वी त्यांच्या स्वागताची आणि सुरक्षेची तयारी सुरु झाली आहे. यादरम्यान अमेरिकी वायू दलाचे हरक्युलिस विमान आणि स्नाइपर्स अहमदाबादमध्ये पोहोचले आहे.

डोनाल्ड आणि मेलानिया ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प 24 फेब्रुवारीला सर्वात पहुले गुजरातच्या अहमदाबादमध्ये जातील. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प एका भव्य कार्यक्रमात सहभागी होतील. या दरम्यान त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तयारी सुरु आहे. ट्रम्प यांच्यासाठी अभेद्य सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे.

या दरम्यान सोमवारी अमेरिकी वायू दलाचे हरक्युलिस विमान अहमदाबाद एअरपोर्टवर पोहचले आहे. या विमानात ट्रम्प यांच्या सुरक्षेत असणाऱ्या सर्व वाहनांचा ताफा होता. या गाड्यांमध्ये स्नाइपर, फायर सेफ्टी सिस्टम आणि स्पाय कॅमेरे लावण्यात आले आहेत. 200 सुरक्षा कर्मचारी यात ताफ्यात असतील. ते अहमदाबाद पोलीस आणि देशातील सुरक्षा यंत्रणेसह सहकार्य करतील.

अमेरिकी सुरक्षा यंत्रणा CIA च्या जवानांनी स्टेडियममध्ये आपली कंट्रोल रुम तयार केली आहे. या प्रकारे भारताची सुरक्षा यंत्रणा SPG ने आणि गुजरात पोलिसांनी स्टेडियममध्ये आपला वेगळे कंट्रोल रुम तयार केला आहे.

दौऱ्यामुळे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला निर्देश देण्यात आले आहे की ट्रम्प येण्यापूर्वी 3 तास आधी अहमदाबाद येणारी सर्व विमानांने विमानतळावर उतरवू नयेत. अहमदाबाद वाहतूक पोलीस डीसीपी विजय पटेल म्हणाले की रोड शोमध्ये कोणत्याही समस्या येऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात असेल. रोड शो पूर्वी मार्गावर बॉम्ब शोधक पथक स्कॅन करुन घेतील.

कशी असेल ट्रम्प यांची सुरक्षा व्यवस्था
ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी वाहतूकीपासून हवाई सुरक्षेपर्यंत सर्व लक्षात घेण्यात आले आहे. रोड शो मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व लोकांची तपासणी करण्यात येईल. याची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर असेल. 10 हजार पोलीस कर्मचारी यावेळी सुरक्षेसाठी तैनात असतील. हवाई सुरक्षेत 7 विमानांचा ताफा असेल. ताफ्यात अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांचे जेट एअरफोर्स वन सह आणखी 6 विमाने असतील. ट्रम्प यांच्या सुरक्षेत ताफ्यात विविध हॅलिकॉप्टर, कार आणि कार्गो देखील सहभागी असतील.

जेव्हा कोणत्याही देशातून ट्रम्प याचा ताफा चालतो त्यात स्थानिक सुरक्षा कर्मचाऱ्यांसह त्यांचे सुरक्षा कर्मचारी, जे शेकडोच्या संख्येने रस्त्यावर धावत असतात. अंतर्गत सुरक्षा अमेरिकी अध्यक्षांची सुरक्षा टीम संभाळते. अंतर्गत सुरक्षेसाठी 14 वाहने असतात. सर्वात पुढे आणि बाजूला 9 मोटार बाइक स्वार, जे शस्त्रांत्रासह असतता. जेणे करुन कोणत्याही संकटांना तोंड देऊ शकतील. अमेरिकी वायू सेनेने ही ट्रम्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे, यामुळे हरक्युलिस विमानसह अनेक गाड्या पोहचल्या आहेत.

रोड शो अहमदाबाद विमानतळापासून सुरु होऊन साबरमती आश्रमापर्यंत पोहोचेल. तेथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली जाईल. त्यानंतर ट्रम्प नव्या सरदार पटेल स्टेडियमचे उद्घाटन करतील. स्टेडियममध्ये 1,00,000 पेक्षा अधिक लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.

कसा असेल अहमदाबादचा नजारा
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान अहमदाबादचा नजारा पाहण्या लायक असेल. ट्रम्प आणि मोदी 7 स्तरीय सुरक्षेने घेरले असतील. लोकांना या मैदानात नेण्यासाठी 2200 बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

हाउडी मोदीं प्रमाणे कोम छो ट्रम्प
केम छो ट्रम्प या कार्यक्रमाचे आयोजन गुजरातमध्ये करण्यात आले आहे. मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तपासाशिवाय कोणीही मैदानात जाऊ शकणार नाहीत.

भारत दौऱ्यावर बोलताना मेलानिया यांनी ट्विट केले की या विशेष प्रसंगी आमंत्रण दिल्याबद्दल धन्यावाद मोदीजी. हा महिन्याच्या अखेरीस मी दिल्ली आणि अहमदाबादला येण्यास उत्सुक आहे. मी आणि अध्यक्ष यासाठी उत्साहित आहोत आणि भारत अमेरिकेची मैत्री साजरी करण्यासाठी तयार आहोत.
ट्रम्प देखील भारत दौऱ्यासाठी उत्साहित आहेत. ते म्हणाले की मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले आहे की फेसबूकवर पहिल्या क्रमांकावर ट्रम्प आणि दुसऱ्या क्रमांकवर भारताचे पंतप्रधान मोदी आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like